
नव्या मुंबई परिसरातील पार्क,मैदाने व उद्यानावर प्रतिबंध असल्याने नवीमुंबई मधील नागरिक नाराज !
सानपाडा प्रतिनिधी : राज्यात इतर ठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर कोरोना (Corona) प्रतिबंध नियमात शिथिलता आणून उद्याने,चौपाटी व इतर सार्वजनिक प्रेक्षणीय स्थळे नागरिकांसाठी खुली केली आहेत. मात्र उद्यानांचे (Garden) शहर अशी ख्याती असलेल्या नवी मुंबईत (Navi Mumbai) मनपाने कोरोना (Corona) प्रादुर्भाव कमी होऊनही येथील उद्याने व पार्क तसेच मैदानांना अद्याप टाळा ठोकलेला आहे त्यामुळे नवी मुंबईकर (Navi Mumbai) नाराज झाले आहेत. अटीशर्तींना अधीन राहून नागरिकांची ही सार्वजनिक स्थळे खुली करावीत अशी मागणी करत आहेत.
नवी मुंबई मनपाने कोरोना प्रादुर्भाव आटोक्यात आणलेला आहे,त्यासाठी आरोग्य यंत्रणा आणि लसीकरण सुविधा देखील मोठया प्रमाणात उभारली आहे.कधीकाळी दररोज हजाराच्या घरात असणारा कोरोना रुग्णांचा आकडा आता पन्नाशीच्या आत आणलेला आहे.मात्र तो वाढू नये म्हणून मनपा प्रशासन हॉटेल्स ,मॉल्स यांच्याप्रमाणे त्यांच्या अखत्यारीतील उद्याने,मैदाने यांना मात्र अद्यापही नागरिकांसाठी खुले करत नाही.नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात वंडर्स पार्क,मिनी सिशोर,सागर विहार,आर आर पाटील उद्यान,रॉक गार्डन,मँगो गार्डन, घणसोलीचे सेंट्रल पार्क अशी अनेक उद्याने व प्रेक्षणीय स्थळे आहेत ज्याठिकाणी नागरिक फेरफटका मारण्यासाठी -मनोरंजनासाठी-मुलांना खेळवण्यासाठी येत असतात.तसेच उद्यानांमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्रे आहेत ती देखील उद्याने बंद असल्याने उघडली जात नाहीत ज्याठिकाणी ज्येष्ठ नागरिक त्यांचा वेळ घालवत असतात



