vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

कांजूरमार्ग येथील सोसायटीतील एका ११ वर्षीय मुलीचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी एका सुरक्षा रक्षकाला मुंबईत अटक

गृहनिर्माण सोसायटीतील एका ११ वर्षीय मुलीचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी एका सुरक्षा रक्षकाला मुंबईत अटक

कांजूरमार्ग_येथील_हनुमान_गल्ली_येथे_राहणारा_२९_वर्षीय_आरोपी_१५_ऑगस्टपासून_मुलीचा_छळ_करत_होता…

#मुंबई : गृहनिर्माण सोसायटीतील एका ११ वर्षीय मुलीचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी एका सुरक्षा रक्षकाला मुंबईत अटक करण्यात आली आहे. कांजूरमार्ग येथील संबंधित सोसायटीत आरोपी वॉचमन गेल्या महिनाभरापासून काम करत होता.

#काय_आहे_प्रकरण?

पीडितेने शुक्रवारी आई-वडिलांकडे आपल्यावरील अत्याचाराचा पाढा वाचला. त्यानंतर तिच्या वडिलांनी पोलिसांकडे तक्रार केली, अशी माहिती पोलिसांनी दिली. कांजूरमार्ग येथील हनुमान गल्ली येथे राहणारा २९ वर्षीय आरोपी १५ ऑगस्टपासून मुलीचा छळ करत होता, असे पोलिसांनी सांगितले.

#२२सप्टेंबरपर्यंत_पोलीस_कोठडी….

कलम ३५४ (A) आणि लैंगिक अपराधांपासून मुलांचे संरक्षण (POCSO) कायद्याच्या संबंधित तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला न्यायालयासमोर हजर केले असता त्याला २२ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

संबंधित पोस्ट

मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी मतदान केंद्र पातळीवर गृहभेटीवर देण्यात येतोय भर

vishwatmaklokswamivarta

केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी केला पंतप्रधानांच्या आवाहनाचा पुनरुच्चार, नागरिकांना स्वदेशी उत्पादने वापरण्याचे केले आवाहन

भारताची मोठ्या सागरी शक्तीच्या दिशेने वाटचाल- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी,युद्धनौका, विनाशिका आणि पाणबुडी एकाच वेळी राष्ट्राला समर्पित..

vishwatmaklokswamivarta

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 :उद्योग विभागांतर्गत सर्व आस्थापनांना मतदानासाठी 20 नोव्हेंबर रोजी सुट्टी

vishwatmaklokswamivarta

मराठा समाजाच्या स्वप्नांना पंख देणारी संस्था – सारथी

vishwatmaklokswamivarta

शिवसेनेचे ‘धनुष्यबाण’ चिन्ह निवडणूक आयोगाने गोठवले; दोन्ही गटांना मिळणार नव्या चिन्हासाठी पर्याय

vishwatmaklokswamivarta