vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्य

माझं गाव आरोग्य संपन्न गाव अभियानाला बुलढाण्यात उत्स्फूर्त प्रतिसाद;जिल्ह्यातील 870 ग्रामपंचायतींचा सक्रिय सहभाग

माझं गाव आरोग्य संपन्न गाव अभियानाला बुलढाण्यात उत्स्फूर्त प्रतिसाद;जिल्ह्यातील 870 ग्रामपंचायतींचा सक्रिय सहभाग

बुलढाणा, प्रतिनिधी): ग्रामीण भागातील नागरिकांचे आरोग्य अधिक सक्षम व निरोगी करण्याच्या उद्देशाने राबविण्यात येत असलेल्या “माझं गाव आरोग्य संपन्न गाव” या अभियानाला बुलढाणा जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. जिल्ह्यातील एकूण 870 ग्रामपंचायतींनी या अभियानात सहभाग नोंदवून आरोग्यदायी गाव उभारण्यासाठी पुढाकार घेतला आहे.या अभियानांतर्गत गावपातळीवर स्वच्छता, सुरक्षित पिण्याचे पाणी, लसीकरण, माता-बाल आरोग्य, संसर्गजन्य व असंसर्गजन्य रोग प्रतिबंध, कुपोषण निर्मूलन, तंबाखूमुक्त परिसर, नियमित आरोग्य तपासणी तसेच जनजागृती उपक्रम राबविण्यात येत आहेत.

ग्रामपंचायत, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, आरोग्य कर्मचारी तसेच ग्रामस्थ यांच्या सक्रिय सहभागामुळे अभियानाला अधिक गती मिळाली आहे. गावांमध्ये आरोग्य विषयक स्पर्धा, स्वच्छता मोहिम, रक्तदाब व मधुमेह तपासणी, पोषण जनजागृती, शाळांमधील आरोग्य शिक्षण तसेच पर्यावरण संवर्धन उपक्रमही आयोजित करण्यात येत आहेत.

“निरोगी गाव – समृद्ध गाव” हा संदेश नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचे कार्य अभियानातून सुरू असून जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण भागात आरोग्याबाबत सकारात्मक वातावरण निर्माण होत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता वाढत असून उर्वरित गावांनीही अभियानात सहभागी होऊन आरोग्य संपन्न गाव घडविण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

00000

संबंधित पोस्ट

जागतिक हिवताप दिन २५ एप्रिल – २०२५- चला हिवतापाला संपवु याः पुन्हा योगदान द्या…

हिंद-दी-चादर’ शहिदी समागम कार्यक्रमानिमित्त 10 ते 25 फेब्रुवारी कालावधीतनवी मुंबई महानगरपालिकेमार्फत विशेष आरोग्य ‍शिबीरांचे आयोजन 

vishwatmaklokswamivarta

अमृत मानस मित्र’ प्रशिक्षण कार्यक्रमाद्वारेमानसिक आरोग्य क्षेत्रात करिअरची “अमृत” मार्फत सुवर्णसंधी!

जागतिक महिला दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात महिला कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी;आरोग्य सल्लाआरोग्य सांभाळण्यास प्राधान्य द्या- जिल्हाधिकारी 

जागतिक हिवताप दिनानिमित्त25 एप्रिल रोजी मोहिमेचे आयोजन

आदिवासी भागात आरोग्य विषयक जनजागृती करावी- मंत्री डॉ. अशोक वुईके