vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

गुटखा-पानमसाला, खाद्यतेल, दुग्धजन्य अन्न पदार्थ, इतर अन्नपदार्थांवर अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई,अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली कारवाई 

गुटखा-पानमसाला, खाद्यतेल, दुग्धजन्य अन्न पदार्थ, इतर अन्नपदार्थांवर अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई,अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली कारवाई

नांदेड प्रतिनिधी :- सर्वसामान्य नागरिकांना सुरक्षित, दर्जेदार व भेसळमुक्त अन्नपदार्थ उपलब्ध व्हावेत या उद्देशाने अन्न व औषध प्रशासन नांदेड यांच्यावतीने मागील आठवडाभरात जिल्ह्यात विविध ठिकाणी विशेष तपासणी मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेदरम्यान गुटखा-पानमसाला, खाद्यतेल, दुग्धजन्य अन्न पदार्थ व इतर अन्नपदार्थांवर, साठ्यांवर छापेमारी करून मोठ्या प्रमाणात जप्ती करण्यात आली. ही कारवाई अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतीच पार पाडण्यात आली आहे.

प्राप्त गोपनीय माहिती व नियमित तपासणीच्या आधारे शुक्रवार 29 मे 2026 रोजी मे. एम.ए. शरीफ जुना मोंढा नांदेड या आस्थापनेची तपासणी करून आस्थापनेतून रिफाईंड सोयाबीन तेल (खुले) या अन्न पदार्थाचा नमुना विश्लेषणासाठी घेवून उर्वरित साठा 718 कि. ग्रॅ. रूपये 1 लाख 14 हजार 880 किंमतीचा अन्न पदार्थ कायद्याचे उल्लघंन करत असल्याच्या संशयावरून जप्त करण्यात आलेला आहे.

शनिवार 30 मे 2026 रोजी मे. रॉयल बेकरी, धनेगाव, ता.जि. नांदेड या पेढीतून रूपये 25 हजार 840 किंमतीचा मिल्क रस्क या मिथ्याछाप अन्न पदार्थाचा साठा जप्त करण्यात आलेला आहे. तसेच मे. रहिम किराणा दुकान माहूर या पेढीतून रिफाईंड सोयाबीन तेल (खुले) या अन्न पदार्थाचा नमुना विश्लेषणासाठी घेवून उर्वरित साठा 358 कि. ग्रॅ. रूपये 57 हजार 280 किंमतीचा अन्न पदार्थ जप्त करण्यात आलेला आहे. तसेच मे. भैरूनाथ आईसक्रिम ॲण्ड कुल्फी हदगाव या पेढीतून कुल्फी, मिल्कशेक या अन्न पदार्थाचा 238 लिटर, रूपये 51 हजार 900 एवढया किंमतीचा साठा अस्वच्छ वातावरणात व विनापरवाना व्यवसाय करीत असल्यामुळे नमुना घेवून नष्ट करण्यात आलेला आहे.

रविवार 31 मे रोजी मे. शोएब पान शॉप देगलूरनाका नांदेड, मे. दुर्गा पान शॉप इस्लापूर, ता.किनवट तसेच मे. साईश्रध्दा पान शॉप इस्लापूर ता.किनवट इत्यादी आस्थापनेत गुटखा-पानमसाला इत्यादी प्रतिबंधित अन्न पदार्थाचा साठा जप्त करण्यात येवून एकूण 4 व्यक्तीविरूध्द संबंधित पोलीस स्टेशन येथे प्रथम खबरी अहवाल नोंदविण्यात आला असून सदरील पेढया सिल करण्यात आलेल्या आहेत. मंगळवार 2 जून 2026 रोजी मे. जयगोपाल कृष्णकुमार ॲण्ड कंपनी जुना मोंढा नांदेड या पेढीतून 1 हजार 348 कि. ग्रॅ. रूपये 1 लाख 3 हजार 346 एवढया किंमतीचा चनाबेसन (दिनार) या अन्न पदार्थाचा साठा कमी दर्जाचा असल्याच्या संशयावरून व मिथ्याछाप असल्यामुळे नमुना घेवून जप्त करण्यात आलेला आहे. तसेच मे. सैफ किराणा शिवाजी चौक, किनवट या आस्थापनेतून गुटखा-पानमसाला इत्यादि प्रतिबंधित अन्न पदार्थाचा रूपये 47 हजार 445/- किंमतीचा साठा जप्त करण्यात येवून संबंधित व्यक्तीविरूध्द पोलीस स्टेशन किनवट येथे प्रथम खबरी अहवाल नोंदविण्यात आला असून सदरील पेढी सिल करण्यात आलेली आहे.

संबंधित अन्नपदार्थांचे नमुने प्रयोगशाळा विश्लेषणासाठी पाठविण्यात आले असून अहवाल प्राप्त झाल्यानंतर अन्न सुरक्षा व मानके अधिनियम 2006 अंतर्गत पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. सदर कारवाई अन्न सुरक्षा अधिकारी संतोष कनकावाड, ऋषिकेश मरेवार, अनिकेत भिसे, अरूण तम्मडवार, अ. नं. ‍गिरी, श्रीमती शिल्पा श्रीरामे, श्रीमती अमृता दुधाटे, नमुना बालाजी सोनटक्के यांच्या पथकाने सहायक आयुक्त संजय चटटे व रा. मा.भरकड यांचे व छत्रपती संभाजीनगर विभागाचे सह आयुक्त (अन्न) श्रीकांत करकाळे यांचे निर्देशान्वये पार पाडलेली आहे.

00000

संबंधित पोस्ट

‘ई-लायब्ररी’चे सरन्यायाधीशांच्या हस्ते लोकार्पण:वकील आणि कायदेक्षेत्राला नवी दिशा

महाज्योतीच्या वतीने विद्यार्थ्यांना टॅब वाटप

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र–हॅसेन राज्याने व्यवसाय, तंत्रज्ञान आणि नवोन्मेषातील सहकार्य वाढवावे- राज्यपाल जिष्णु देव वर्मा

शेती उत्पादन वाढ, शेतमाल निर्यातीसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान उपयुक्त- पालकमंत्री चंद्रकांत पाटील- कृषि विभागाच्या शेतकरी परिसंवादात प्रतिपादन- शेतकऱ्यांनी शेतीपूरक व्यवसाय, प्रक्रिया उद्योगाकडे वळण्याचे आवाहन

अवैध दारू प्रतिबंध जिल्हास्तरीय समिती अशासकीय सदस्यांची नियुक्ती, अर्ज मागविले

vishwatmaklokswamivarta

अवैध सावकारी पिळवणूकीच्या त्रासाच्या अनुषंगाने पिडीतांनी संपर्क साधण्याचे आवाहन