vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र ऑटो-रिक्षा आणि मिटर्ड टॅक्सी चालक  कल्याणकारी मंडळाच्या नाव आणि नियमावलीतील सुधारणा

धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र ऑटो-रिक्षा आणि मिटर्ड टॅक्सी चालक  कल्याणकारी मंडळाच्या नाव आणि नियमावलीतील सुधारणा

रायगड-अलिबाग, प्रतिनिधी :-शासनाच्या गृह विभागाकडील दि.20 मे 2026 चे शासन शुद्धीपत्रक आणि परिवहन आयुक्त कार्यालयाच्या निर्देशानुसार, राज्यातील ऑटो-रिक्षा व मीटर्ड टॅक्सी चालक/मालकांच्या सामाजिक व आर्थिक कल्याणासाठी स्थापित करण्यात आलेल्या कल्याणकारी मंडळाच्या नावात आणि नियमावलीत शासनाने अत्यंत महत्त्वपूर्ण सुधारणा केली आहे अशी माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी पनवेल जयंत चव्हाण यांनी दिली आहे

या कल्याणकारी मंडळाचे नाव बदलून आता “धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र प्रवासी वाहतूक चालक कल्याणकारी मंडळ” असे करण्यात आले आहे. यापूर्वी या मंडळाचे सभासदत्व केवळ ऑटो-रिक्षा आणि मिटर्ड टॅक्सी चालकांपुरतेच मर्यादित होते. मात्र, जास्तीत जास्त वाहन चालकांना विविध सरकारी कल्याणकारी योजना व सुविधांचा लाभ मिळावा या उ‌द्देशाने शासनाने आता याच्या पात्रतेमध्ये मोठी सुधारणा केली आहे. नवीन नियमांनुसार, ऑटो-रिक्षा आणि टॅक्सी चालकांसोबतच, सर्व प्रकारची प्रवासी वाहने चालविणारे आणि वैध ‘बॅज’ (Badge) व अनुज्ञप्ती (Driving License) धारक असलेले सर्व चालक या मंडळाचे सभासद होण्यासाठी पात्र ठरले आहेत.

सर्व प्रकारच्या प्रवासी वाहनांच्या अधिकृत बॅजधारक चालकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा. मंडळाकडून राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवण्यासाठी पात्र चालकांनी जास्तीत जास्त संख्येने या कल्याणकारी मंडळाचे सभासद व्हावे.

000000

संबंधित पोस्ट

राज्य युवा पुरस्कारासाठी 15 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

जालना मध्ये स्थानिक नेत्यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश…

महाबळेश्वर महापर्यटन महोत्सव २०२५’लाराज्यपाल सी.पी.राधाकृष्णन उपस्थित राहणार-पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले निमंत्रण

गडचिरोलीच्या औद्योगिक विकासासाठी जिल्हा उद्योग मित्र समितीची बैठक १७ जुलैला स्टील हब’च्या दिशेने रोडमॅपसह उद्योगवाढ, रोजगार आणि नवउद्योजकतेवर होणार सविस्तर चर्चा,उद्योग क्षेत्राशी संबंधित घटकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन

जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू…

vishwatmaklokswamivarta

जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषदेच्या 61 गटांसाठी आरक्षण सोडत जाहीर..

vishwatmaklokswamivarta