vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रिया २०२६-२७ : प्रतीक्षाधीन यादीतील दुसऱ्या फेरीस प्रारंभ

आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रिया २०२६-२७ : प्रतीक्षाधीन यादीतील दुसऱ्या फेरीस प्रारंभ

 

ठाणे, प्रतिनिधी) : शिक्षण हक्क कायदा (RTE) २००९ अंतर्गत खासगी विनाअनुदानित शाळांमधील २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रिया २०२६-२७ साठी प्रतीक्षाधीन यादीतील (Waiting List) दुसऱ्या फेरीस दि. ०४ जून, २०२६ ते १२ जून, २०२६ पर्यंत कालावधी देण्यात आला आहे.

राज्य शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या निर्देशानुसार आणि शिक्षण संचालक (प्राथमिक), महाराष्ट्र राज्य यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. पहिल्या फेरीतील प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर रिक्त राहिलेल्या जागांवर प्रतीक्षाधीन यादीतील पात्र विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी दुसरी फेरी सुरू करण्यात आली आहे.

या फेरीमध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी आरटीई प्रवेश पोर्टलवर उपलब्ध माहितीनुसार निश्चित कालावधीत संबंधित शाळेत आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहून प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी. मुदतीत प्रवेश निश्चित न केल्यास संबंधित जागा पुढील पात्र विद्यार्थ्यास उपलब्ध करून दिली जाईल.

पालकांनी प्रवेश प्रक्रियेसाठी आवश्यक असलेली कागदपत्रे, निवासाचा पुरावा, जन्मनोंद प्रमाणपत्र, आधार कार्ड तसेच शासनाने निर्देशित केलेली इतर कागदपत्रे तयार ठेवावीत. प्रवेश प्रक्रियेदरम्यान कोणतीही अडचण आल्यास संबंधित गटशिक्षणाधिकारी कार्यालय, शिक्षण विभाग अथवा आरटीई हेल्पडेस्कशी संपर्क साधावा.

आरटीई अंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल व वंचित घटकांतील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्याचा शासनाचा उद्देश असून, पात्र पालकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन शिक्षण विभागामार्फत करण्यात आले आहे.

“शिक्षणाचा अधिकार प्रत्येक बालकाचा मूलभूत हक्क आहे. आरटीई प्रवेश प्रक्रियेच्या माध्यमातून गुणवत्तापूर्ण शिक्षणाची संधी समाजातील वंचित व दुर्बल घटकांपर्यंत पोहोचत आहे. प्रतीक्षाधीन यादीतील दुसऱ्या फेरीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी विहित मुदतीत प्रवेश प्रक्रिया पूर्ण करून या संधीचा लाभ घ्यावा,” असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांनी केले आहे.

०००

संबंधित पोस्ट

शेतकऱ्यांनी बीजप्रक्रिया करूनच पेरणी करावी; कृषी विभागाचे आवाह

बाल हक्क संदर्भात 21 नोव्हेंबर रोजी एक दिवसीय परिषदेचे आयोजन*

vishwatmaklokswamivarta

कॉटन असोसिएशन इंडियाच्यावतीने शेतकऱ्यांना बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंपाचे  वाटप

मेरीटाइम दिनानिमित्त मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्याकडून महायुद्धात बलिदान दिलेल्या नौसैनिकांना श्रद्धांजली

दशसूत्री उपक्रमांतर्गत जिल्ह्यात एकाच वेळी १९२० शाळांमध्ये पालक सभा चांगले नागरिक घडविण्यासाठी संस्कार आवश्यक-जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

vishwatmaklokswamivarta

विधान परिषद निवडणूक : लातूर जिल्ह्यात ३६७ मतदार बजाविणार हक्क• सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मतदानाचा कालावधी• संबंधित तालुकास्तरावर मतदान केंद्र; प्रशासन सज्ज