vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

कॉटन असोसिएशन इंडियाच्यावतीने शेतकऱ्यांना बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंपाचे  वाटप

 कॉटन असोसिएशन इंडियाच्यावतीने शेतकऱ्यांना बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंपाचे  वाटप

मुंबई, प्रतिनिधी: कॉटन असोसिएशन इंडिया तर्फे 79 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्ताने कॉटन एक्सचेंज बिल्डिंग, हॉटेल ग्रीन स्टेशन, मुंबई येथे भारतीय कपास निगमचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक ललित कुमार गुप्ता, कॉटन असोसिएशन इंडियाचे अध्यक्ष अतुल गणात्रा यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र राज्यातील विदर्भ, मराठवाडा आणि खानदेश विभागांमधील शेतकऱ्यांना बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंपाचे वाटप करण्यात आले.

याप्रसंगी कॉटन असोसिएशन इंडियाचे सर्व संचालक विनय कोठारी, सुधीर मंत्री, श्याम मखारीया, पंकज नेपाणी, पंकज बंगडीवाला, मनीष डागा, मनीष शहा, शेतकऱ्यांचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर भामरे, धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील शेतकरी दिलीप हरी पवार, आनंदा चिन्ह, आबा मगन शिंपी, ईश्वर आत्माराम माळी, धनराज त्र्यंबक माळी, ज्ञानेश्वर संतोष पवार आदि मान्यवर उपस्थित होते.याप्रसंगी कॉटन असोसिएशन इंडियाचे अध्यक्ष अतुल गणात्रा यांनी सांगितले की, आम्ही शेतकऱ्यांसाठी योग्य ते निर्णय घेत असून शेतकऱ्यांना जे सहकार्य करता येईल ते करत असतो.

यावेळी भारतीय कपास निगमचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक ललित कुमार गुप्ता यांनी मनोगत व्यक्त केले.

00000

संबंधित पोस्ट

राज्यात गेल्या तीन चार दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी अतिवृष्टीस्थितीचा घेतला आढावा..

अमली पदार्थाच्या दुष्परिणामाबाबत जनजागृती करा  – जिल्हाधिकारी अशोक काकडे,सांगली जिल्हा एनकॉर्ड समितीची बैठक संपन्न

जिल्हा रुग्णालयात नर्सिंग पदवी अभ्यासक्रमास मंजुरी

श्री. क्षेत्र पंढरपूर येथे विठुरायाच्या दर्शनासाठी येणाऱ्या लाखो भाविकांसाठी आषाढी एकादशीला प्रवासी सेवेसाठी येणाऱ्यासर्व एसटी कर्मचाऱ्यांना मोफत भोजन व्यवस्था- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबईतील पवई येथे वेब सिरीज च्या ऑडिशन नावाखाली वीस मुलांना डांबून ठेवून त्यांना जिवंत जाळण्याची धमकी देणाऱ्या आरोपी रोहित आर्य पोलिसांच्या चकमकीत ठार 

vishwatmaklokswamivarta

एक जिल्हा, एक उत्पादन- 2024’ पुरस्कारात महाराष्ट्राची चमकदार कामगिरी राज्याला ‘अ’ श्रेणीत सुवर्णपदक कृषी आणि गैर कृषी क्षेत्रात रत्नागिरी, नागपूर, अमरावती, नाशिक आणि अकोला जिल्ह्याची उत्कृष्ट कामगिरी..