vishwatmaklokswamivarta
Breaking News
व्यवसाय

गोदाम बांधकाम व मिनी ऑईल मिलसाठी २२ जूनपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन

गोदाम बांधकाम व मिनी ऑईल मिलसाठी २२ जूनपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन

 

अहिल्यानगर, प्रतिनिधी : राष्ट्रीय खाद्यतेल अभियान-तेलबिया सन २०२६-२७ अंतर्गत जिल्ह्यात गोदाम बांधकाम, काढणीपश्चात पायाभूत सुविधा तसेच मिनी ऑईल मिल/एक्सपेलर-फिल्टर प्रेस या घटकांसाठी अनुदान देण्यात येणार आहे. पात्र लाभार्थ्यांनी दि. २२ जून २०२६ पर्यंत संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयात अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांनी केले आहे.

जिल्ह्यासाठी २५० मे. टन क्षमतेच्या एका गोदाम बांधकामाचे लक्ष्य प्राप्त झाले आहे. या घटकांतर्गत प्रत्यक्ष प्रकल्प खर्चाच्या ५० टक्के किंवा १४ लाख ४० हजार रुपये, यापैकी जी रक्कम कमी असेल तेवढे अनुदान देण्यात येणार आहेतसेच प्राथमिक प्रक्रिया व काढणीपश्चात पायाभूत सुविधा घटकासाठी एक भौतिक लक्ष्य निश्चित करण्यात आले असून प्रत्यक्ष प्रकल्प खर्चाच्या ३३ टक्के किंवा कमाल ९ लाख ९० हजार रुपये इतके अनुदान मंजूर करण्यात येणार आहे

मिनी ऑईल मिल/एक्सपेलर-फिल्टर प्रेससह युनिटसाठी प्रति युनिट कमाल ४ लाख रुपये, तर फिल्टर प्रेसशिवाय युनिटसाठी प्रति युनिट कमाल ३ लाख रुपये अनुदान देण्यात येणार आहे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, सिमांत शेतकरी व महिला प्रवर्गासाठी युनिटच्या किंमतीच्या ५० टक्के, तर सर्वसाधारण प्रवर्गासाठी ४० टक्के अनुदान मंजूर करण्यात येईल.

गोदाम बांधकामासाठी शासकीय संस्था, खाजगी उद्योग, समूह आधारित व्यवसाय संस्था शेतकरी उत्पादक संस्था/कंपनी तसेच सहकारी संस्थांना सहाय्य देण्यात येणार आहे. ही योजना बँक कर्जाशी निगडित असल्याने केंद्र शासनाच्या संबंधित मार्गदर्शक सूचनांनुसार राष्ट्रीयकृत बँकेकडे प्रस्ताव सादर करणे आवश्यक राहणार आहे.

शेतकरी उत्पादक कंपनीने सभासद यादी, मागील तीन वर्षांचे लेखापरीक्षण अहवाल, ७/१२ उतारा अथवा भाडेतत्त्वावरील जमिनीचा २९ वर्षांचा करारनामा तसेच कंपनीचा टॅन व पॅनक्रमांक सादर करणे आवश्यक आहे. काढणीपश्चात पायाभूत सुविधा घटकासाठीही आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करणे बंधनकारक आहे.

मिनी ऑईल मिल/एक्सपेलर-फिल्टर प्रेससह अथवा फिल्टर प्रेसशिवाय घटकासाठी शेतकरी उत्पादक कंपनी, मूल्य साखळी भागीदार व वैयक्तिक शेतकरी पात्र राहतील. एका कुटुंबातील पती, पत्नी व अविवाहित मुलांपैकी केवळ एका व्यक्तीस आर्थिक सहाय्य मंजूर करण्यात येणार आहे

इच्छुक लाभार्थ्यांनी महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या अधिकृत अभियंत्यांकडून मान्यताप्राप्त आराखडा, तपशीलपत्र व खर्चाचे अंदाजपत्रक यांसह अर्ज संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयात सादर करावेत, असेही जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. बोराळे यांनी कळविले आहे.#राष्ट्रीयखाद्यतेलअभियान #AgriBusiness2026 #अहिल्यानगर #Ahilyanagar #गोदामबांधकाम #मिनीऑईलमि

0000

संबंधित पोस्ट

बांधकाम कामगारांना नियुक्त संस्थेच्या वितरण केंद्रावर गृहोपयोगी वस्तू संचाचे वितरण- सहाय्यक कामगार आयुक्त मु. अ. मुजावर

16 सप्टेंबर रोजी जालना येथे प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाकडून लघु उद्योगासाठी अर्थसहाय..

vishwatmaklokswamivarta

पणन हंगाम 2024-25 योजनेंतर्गत धान खरेदी करण्यासाठी दि.31 मार्च 2025 रोजी पर्यंत मुदतवाढ..

vishwatmaklokswamivarta

बायोफ्लॉक मत्स्यसंवर्धनाबाबत दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन

कृत्रिम वाळू युनिट स्थापन करणाऱ्यांसाठी संधी;6 मार्चला विशेष मार्गदर्शन सभेचे आयोजन