vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

कोविड काळातील शैक्षणिक फी माफीचे आश्वासन पूर्ण न झाल्याने सेंट्रल मार्डने संपाचे हत्यार, मेडिकलचे निवासी डॉक्टर आजपासून संपावर…

कोविड काळातील शैक्षणिक फी माफीचे आश्वासन पूर्ण न झाल्याने सेंट्रल मार्डने संपाचे हत्यार, मेडिकलचे निवासी डॉक्टर आजपासून संपावर…

प्रदेश प्रतिनिधी   : कोविड काळातील शैक्षणिक फी माफीचे आश्वासन पूर्ण न झाल्याने सेंट्रल मार्डने संपाचे हत्यार उपसले आहे. १ ऑक्टोबरपासून मेयो, मेडिकलचे निवासी डॉक्टरसंपावर जात आहेत.रुग्णसेवा प्रभावित होऊ नये म्हणून दोन्ही रुग्णालयांमध्ये सहायक प्राध्यापकांच्या वॉर्डात ड्युटी लावण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे, अस्थायी सहायक प्राध्यापकही आपल्या मागण्यांना घेऊन ४ ऑक्टोबरपासून संपावर जात आहेत. यादरम्यान तोडगा न निघाल्यास शासकीय रुग्णालय अडचणीत येण्याची शक्यता आहे.

कोरोना काळातील फी माफी, कोविड प्रोत्साहन भत्ता, हॉस्टेल समस्या, पालिकेतील निवासी डॉक्टरांचा टीडीएस अशा विविध मुद्द्यांवर फक्त आश्वासनं मिळाली पण मागण्या पूर्ण झाल्या नाहीत. त्यामुळे डॉक्टरांनी संप पुकारला आहे. या संपामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांतील सर्व निवासी डॉक्टरांचा समावेश आहे. या संपामुळे रुग्णव्यवस्था कोलमडण्याची शक्यता आहे. हा संप होऊ नये म्हणून प्रशासन आणि डॉक्टरांची २-३ तास चर्चा झाली. मात्र, प्रशासनाकडून डॉक्टरांच्या मनधरणीचे प्रयत्नही निष्फळ ठरले. दरम्यान आपत्कालीन आणि अतिदक्षता विभागातील सेवा सुरू राहतील, संघटनेकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

दरम्यान, सध्या राज्यातील कोरोनाचे रुग्ण कमी झाले असले तरी कोरोना संकट कायम आहे. त्यात इतर आजारांचे रुग्ण, शस्त्रक्रिया यामुळे रुग्णालयावरील ताण वाढत आहे. अशातच निवासी डॉक्टरांनी संप पुकारल्यामुळे अनेक अडचणींना सामोरे जावे लागणार आहे.

संबंधित पोस्ट

उद्योगमंत्री उदय सामंत यांची अतिवृष्टी नुकसानग्रस्त भागाची पाहणी…

vishwatmaklokswamivarta

विभागीय कला व क्रीडा महोत्सव 2025 थाटात संपन्न

vishwatmaklokswamivarta

बॉलिवूड सुपरस्टार शाहरूख खानचा,आर्यन खान अडकला. पण त्याच्यापेक्षाही या प्रकरणात अरबाज मर्चंट हे नाव मोठं मानलं जातंय…

पाच वर्षांनंतरही शासनाचा आदेश बासनात; दारू दुकाने व ‘बार’ला देवता-राष्ट्रपुरुषांची नावे !श्रद्धास्थानांचा अवमान रोखण्याऐवजी शासकीय अधिकार्‍यांकडून बार मालकांची पाठराखण; अधिकार्‍यांवर कारवाई करा ! – हिंदु जनजागृती समितीची मागणी

01 मे ध्वजारोहण कार्यक्रमविभागीय आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी यांच्याहस्ते

संविधान, धर्मनिरपेक्षता आणि कायदा तोपर्यंतच राहील जोपर्यंत हिंदूंची संख्या जास्त असेल. हिंदू जर अल्पसंख्यांक झाले तर काहीच राहणार नाही. उपमुख्यमंत्री नितीन पटेल.