vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

फलटण तालुक्यात पशुपालकांच्या दारात भ्रूण प्रत्यारोपण योजनेचा शुभारंभ

फलटण तालुक्यात पशुपालकांच्या दारात भ्रूण प्रत्यारोपण योजनेचा शुभारंभ

 सातारा, प्रतिनिधी पशुसंवर्धन क्षेत्रात क्रांती घडवून आणण्याच्या उद्देशाने जिल्हा परिषद सातारा यांच्या सेस फंडातून व महाराष्ट्र पशुधन विकास मंडळ यांच्या सहयोगाने ‘पशुपालकांच्या दारात भ्रूण प्रत्यारोपण द्वारे गर्भधारणा’ हा एक नाविण्यपूर्ण व महत्वाकांक्षी उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमाची सुरुवात दि. २५ जून २०२६ रोजी सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यात उत्साहात करण्यात आली.

या योजनेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे पशुपालकांना उच्च वंशावळीच्या भ्रूणाद्वारे निश्चित गर्भधारणा (करण्यासाठी जिल्हा परिषद सातारा मार्फत तब्बल ९० टक्के अनुदान देण्यात येणार आहे. यामुळे ग्रामीण भागातील सर्वसामान्य शेतकऱ्यांना व पशुपालकांना अत्यंत कमी खर्चात आपल्या गोठ्यात उच्च दर्जाची व अधिक दूध देणारी जनावरे तयार करता येणार आहेत.

संपूर्ण प्रकल्प ‘महाराष्ट्र पशुधन विकास मंडळ’ (एमएलडीबी), नागपूर अंतर्गत कार्यरत असलेल्या ‘भ्रूण प्रत्यारोपण प्रयोगशाळा, ताथवडे (पुणे)’ यांच्या माध्यमातून राबवला जात आहे. या योजनेच्या पहिल्याच दिवशी फलटण तालुक्यात तांत्रिक पथकाच्या देखरेखीखाली एकूण १२ गाईंमध्ये भ्रूण प्रत्यारोपणाची प्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडण्यात आली. या आधुनिक तंत्रज्ञानामुळे स्थानिक जनावरांच्या दुग्धोत्पादनात व वंशावळीत मोठी सुधारणा होणार आहे. फलटण येथील सदर उपक्रमाच्या शुभारंभासाठी राज्य समन्वयक अधिकारी, भ्रुण प्रत्यारोपण प्रयोगशाळा,डॉ. विष्णू जवणे यांच्या समवेत लघुपशुवैद्यकीय सर्वचिकित्सालय, फलटण केंद्रातील पशुवैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

00000

संबंधित पोस्ट

150 दिवसीय ई – गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमात नांदेड परिक्षेत्र अव्वल मा. मुख्यमंत्री यांच्या शुभहस्ते पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांचा सन्मान 

सुधीर मुनगंटीवार यांच्या मदतीमुळे सुरेखा शिंदे पुन्हा स्वत:च्या पायावर उभ्या झाल्याआ. मुनगंटीवार यांच्या संवेदनशील कृतीने मुलीच्या डोळ्यात आले पाणीआई पुन्हा चालू लागली… हे केवळ वैद्यकीय यश नाही, तर सुधीरभाऊंसारख्या संवेदनशील नेतृत्वामुळे शक्य

पाणीटंचाई, उष्माघाताबाबत तातडीने उपाययोजना कराव्यात – जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया कर्जत – जामखेड येथे जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रशासकीय कामकाजाचा आढावा

पाणी टंचाई निवारणार्थ चिखली तालुक्यातील धोत्रानाईक, वरवंड व धानोरी गावासाठी टँकर मंजूर

भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचे ‘स्टॉकहोम कॉन्फरन्स’मध्ये आज भाषण स्वीडनमधील भारतीय समुदायासोबत संस्मरणीय संवाद

संकटातील मुलांसाठी जीवनरेखा… : १०९८ चाईल्ड हेल्पलाईन

vishwatmaklokswamivarta