vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

तृतीयपंथीय विद्यार्थ्यांसाठी केंद्र सरकारची शिष्यवृत्ती योजन

तृतीयपंथीय विद्यार्थ्यांसाठी केंद्र सरकारची शिष्यवृत्ती योजन

           सांगली, प्रतिनिधी: केंद्र शासनाने ट्रान्सजेंडर व्यक्तींच्या कल्याणासाठीची केंद्रीय क्षेत्र योजना ‘Support for Marginized Individuals for livelihood and Enterprise (SMILE)’ या छत्र योजनेच्या अंतर्गत तृतीयपंथीय/ ट्रान्सजेंडर विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती या उपयोजनेचा समावेश केला आहे. ही योजना केंद्र शासनाच्या https://transgender.dosje.gov.in या राष्ट्रीय पोर्टलवरून राबविण्यात येत आहे. या पोर्टलवर इ.9वी व त्यापुढील वर्गामध्ये शिक्षण घेणाऱ्या जिल्ह्यातील पात्र तृतीयपंथीय विद्यार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन अर्ज भरून शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन समाज कल्याण सांगली सहाय्यक आयुक्त बाळासाहेब कामत यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे

       इयत्ता 9 वी व त्यापुढील वर्गामध्ये शिक्षण घेत असलेल्या तृतीयपंथीय विद्यार्थ्यांना त्यांचे शिक्षण पूर्ण करता यावे यासाठी आर्थिक सहाय्य प्रदान करणे हा या योजनेचा उद्देश आहे

पात्रता निकष-      विद्यार्थ्यांकडे तृतीयपंथीयांसाठीचे राष्ट्रीय पोर्टल यावरून जारी केलेले ओळखपत्र असणे आवश्यक आहे. तो भारताचा नागरिक असावा. राज्य किंवा केंद्र शासनाकडील अन्य कोणत्याही शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेत नसावा. विद्यार्थ्याचे बँक खाते हे आधारशी संलग्न असावे व टी.जी.ओळखपत्र व बँक खाते या दोहोंवरील नाव एकच असावे.      लाभाचे स्वरूप – प्रत्येक शैक्षणिक वर्षासाठी रु.13,500/- इतकी रक्कम शिष्यवृत्ती म्हणून पात्र तृतीयपंथीय विद्यार्थ्याला देय राहील

आवश्यक कागदपत्रे राष्ट्रीय पोर्टलवर विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज करताना त्यांचे स्वयंसाक्षांकित पासपोर्ट आकाराचे छायाचित्र, टी.जी.ओळखपत्र, इतर शिष्यवृत्ती घेत नसलेबाबतचे घोषणापत्र, मागील शैक्षणिक वर्षाच्या गुणपत्रिकेची प्रत, आधारकार्ड स्वयंसाक्षाकित प्रत, इतर संस्थेत प्रवेश घेतला असल्यास स्थलांतर प्रमाणपत्र, संस्था पडताळणी अर्ज व अर्ज नूतनीकरणासाठी संस्थेमार्फत प्रमाणित केलेले मागील शैक्षणिक वर्षातील किमान पात्रता गुणपत्रक इत्यादी.

                                                                                  योजनेच्या अधिक माहितीसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, जुना बुधगांव रोड सांगली येथील सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण सांगली या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे प्रसिध्दीपत्रकात म्हटले आआहे.

0000

0

संबंधित पोस्ट

अक्षय तृतीयेच्या पार्श्वभूमीवर बालविवाह रोखण्यासाठी जिल्ह्यात प्रशासन सतर्क ; जिल्हाधिकाऱ्यांचे सर्व यंत्रणांना निर्देश

राज्यस्तरीय शालेय शिक्षण परिषदेचा समारोप; शालेय शिक्षणमंत्री दोन्ही दिवस उपस्थित शालेय शिक्षण दर्जेदार पद्धतीने देण्यासह विविध विषयांवर महत्त्वपूर्व चर्चा

vishwatmaklokswamivarta

आज महाराष्ट्र सरकारचा स्टारलिंकसोबत करार

vishwatmaklokswamivarta

उद्योगांना पोषक वातावरण निर्मितीवर भर द्यावा-जिल्हाधिकारी आशिष येरेकर

vishwatmaklokswamivarta

जिल्हा वार्षिक योजनेतून पोलीस विभागाला मिळालेल्या वाहनांचे लोकार्पणपोलीस विभाग अत्याधुनिक करण्यावर भर  – पालकमंत्री शंभूराज देसाई

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पदयात्रेचे आयोजन