vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

1 जुलै रोजी पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन

1 जुलै रोजी पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन

नांदेड प्रतिनिधी:- नांदेड जिल्हयातील बेरोजगार उमेदवारांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी, यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्यावतीने बुधवार 1 जुलै 2026 रोजी सकाळी 11 वाजेपासून जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र , आनंदनगर रोड, बाबा नगर नांदेड येथे पंडीत दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

या रोजगार मेळाव्यामध्ये नामांकित हॉस्पिटल, बँक तसेच इतर आस्थापनांच्यावतीने मुलाखती घेण्यात येणार आहेत. नांदेड जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांनी बुधवार 1 जुलै 2026 रोजी सकाळी 11 वा. रोजगार मेळाव्यास उपस्थित राहून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त डॉ.रा.म. कोल्हे यांनी केले आहे.

अधिक माहितीसाठी सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र , आनंदनगर रोड, बाबा नगर नांदेड कार्यालयाचा ई-मेल आयडी nandedrojgar01@gmail.com आणि कार्यालयाचा दूरध्वनी क्रमांक 02462-251674 यावर संपर्क साधावा, असेही आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्यावतीने करण्यात आले आहे.

00000

संबंधित पोस्ट

नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक-2025 काय करावे व काय करु नये मार्गदर्शक सूचना जारी…

vishwatmaklokswamivarta

आता ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मोफत जेईई – सीईटीची कोचिंग पालकमंत्र्यांच्या हस्ते ‘चांदा ज्योती सुपर १००’ अभ्यासिकेचे उद्घाटन; जिल्हा परिषदेचा अभिनव उपक्रम

पैठण-संत एकनाथ महाराज  नाथषष्ठी यात्रोत्सवानिमित्त वाहतूक मार्गात बदल…

रेल्वे तिकिटाचे आरक्षण – तत्काळ तिकीटासाठी-मोठा बदल ओटीपी अनिवार्य-दलाल मुक्त करण्यासाठी एक निर्णायक पाऊल..

vishwatmaklokswamivarta

सिने कलाकारांसाठी स्वतंत्र नियमावली तयार करण्यात येणार -कामगार मंत्री आकाश फुंडकर

vishwatmaklokswamivarta

शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षेचे धडे* जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्यावतीने जनजागृती * जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते झाले उद्घाटन

vishwatmaklokswamivarta