vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्य

चांडोळ येथे सर्वसमावेशक प्राथमिक आरोग्य सेवा प्रशिक्षण संपन्न; ग्रामीण आरोग्य सेवा अधिक सक्षम होणार

चांडोळ येथे सर्वसमावेशक प्राथमिक आरोग्य सेवा प्रशिक्षण संपन्न; ग्रामीण आरोग्य सेवा अधिक सक्षम होणार

बुलढाणा, l प्रतिनिधी: ग्रामीण भागातील नागरिकांना गुणवत्तापूर्ण, सुलभ व सर्वसमावेशक आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र, चांडोळ (ता. बुलढाणा) येथे आयोजित करण्यात आलेले सर्वसमावेशक प्राथमिक आरोग्य सेवा (CPHC) प्रशिक्षण उत्साहात संपन्न झाले.

दि. २६ ते ३० जून २०२६ या कालावधीत झालेल्या या प्रशिक्षणाला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात यांनी भेट देऊन प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन केले. ग्रामीण भागातील नागरिकांना प्रभावी व दर्जेदार आरोग्य सेवा देण्यासाठी हे प्रशिक्षण महत्त्वपूर्ण ठरणार असून प्रशिक्षित आरोग्य कर्मचारी दुर्धर आजार, हृदयविकार, अपघात, सर्पदंश तसेच अन्य आपत्कालीन परिस्थितींमध्ये अधिक सक्षमपणे सेवा देऊ शकतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला‘माझे गाव आरोग्य संपन्न गाव – कसं काय?’ या अभियानांतर्गत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रणजीत मंडाले यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. प्रशिक्षणामध्ये समुदाय आरोग्य अधिकारी (CHO), आशा स्वयंसेविका, आरोग्य सेवक व आरोग्य सेविका यांनी सक्रिय सहभाग नोंदविला

प्रशिक्षणादरम्यान गरोदर माता व प्रसूती सेवा, नवजात बालकांचे आरोग्य, किशोरवयीन आरोग्य, कुटुंब कल्याण, संसर्गजन्य व असंसर्गजन्य रोगांचे नियंत्रण, मानसिक आरोग्य, ज्येष्ठ नागरिकांची काळजी, आपत्कालीन वैद्यकीय सेवा तसेच योग व आरोग्य संवर्धन अशा १३ विविध आरोग्य सेवांबाबत सैद्धांतिक आणि प्रात्यक्षिक प्रशिक्षण देण्यात आले.

यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरज चिंचोले यांनी प्रशिक्षित आरोग्य कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून नागरिकांच्या दारापर्यंत आरोग्य सेवा पोहोचविण्याचे महत्त्व अधोरेखित केले. डॉ. प्रशांत बुधवत यांनी प्रतिबंधात्मक आरोग्य सेवांना प्राधान्य देण्याची गरज व्यक्त केली. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सरपाते यांनी “आरोग्य सेवा हीच पूजा, रुग्ण हाच परमेश्वर” हा संदेश देत सेवाभावी वृत्तीने कार्य करण्याचे आवाहन केले.

प्रशिक्षणासाठी डॉ. निलेश जाधव, डॉ. संतोष सांगळे, स्वाती शेंद्रे, सुवर्णा बेलसरे, सुनिता जवंजाळ, कविता खाडे आणि सुलोचना परहाड यांनी मार्गदर्शन केले. प्रशिक्षण यशस्वी करण्यासाठी आरोग्य सहाय्यक सुनील लोखंडे तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र चांडोळ येथील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉ. नितीन कदम यांनी केले.

00000

संबंधित पोस्ट

रुग्णालयांना पॅनलवर समावेशासाठी संपर्क साधण्याचे आवाहनआर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना लाभ मिळून आरोग्य सुविधा अधिक सक्षम होण्यास मदत होणार

राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने चिल्ड्रन्स इन्व्हेस्टमेंट फंड फाऊंडेशन (#सीआयएफएफ), युनायटेड किंगडम सोबत सामाजिक व वर्तन बदल संप्रेषण उपक्रम बळकट करण्यासाठी सामंजस्य करार

राष्ट्रीय कुटुंब कल्याण नियोजन कार्यक्रम अंतर्गत पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया पंधरवडा२१ नोव्हेंबर ते ४ डिसेंबर २०२५ या कालावधीत आरोग्य विभागातर्फे सर्व्हेक्षण व मोफत पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया

vishwatmaklokswamivarta

लहान गावांमध्ये कफ सिरप विक्रीवर आता कडक निर्बंध परवानाधारक औषधविक्रेत्यांकडूनच विक्री अनिवार्य, केंद्र सरकारचा निर्णय

स्वस्थ नारी, सशक्त परिवार’ महिलांसाठी आरोग्य शिबीर१७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत विशेष अभियान

vishwatmaklokswamivarta

गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात प्रथमच यशस्वी ‘टोटल नी रिप्लेसमेंट’ (गुडघा प्रत्यारोपण) शस्त्रक्रिया संपन्न