vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

पॉश कायद्याची प्रभावी अंमलबजावणी आवश्यक कार्यालयीन समित्यांनी अधिक सक्रिय व्हावेराष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर

पॉश कायद्याची प्रभावी अंमलबजावणी आवश्यक कार्यालयीन समित्यांनी अधिक सक्रिय व्हावेराष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर

अकोला, प्रतिनिधी: प्रत्येक कामाचे ठिकाण हे सुरक्षितता, सन्मान आणि समान संधी देणारे असले पाहिजे. त्यादृष्टीने पॉश कायद्यांतर्गत आस्थापनांमध्ये स्थापित तक्रार निवारण समित्यांनी अधिक जागरूक राहून कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी प्रयत्न करावेत, असे प्रतिपादन राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी आज येथे केले.

कामाच्या ठिकाणी लैंगिक छळापासून संरक्षण (पॉश ऍक्ट) कायद्याबाबत कार्यशाळा श्रीमती रहाटकर यांच्या उपस्थितीत नियोजनभवनात झाली, त्यावेळी त्या बोलत होत्या. जिल्हाधिकारी वर्षा मीना, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनय नावंदर, जिल्हा विधी प्राधिकरणाचे सचिव दीनानाथ दाभाडे, पोलिस अधीक्षक अर्चित चांडक, आयोगाचे उपसंचालक रामावतार सिंह, नंदिता प्रधान, महापालिकेचे आयुक्त सुनील लहाने, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी लक्ष्मण हगवणे, पर्यवेक्षकीय अधिकारी गिरीश पुसदकर आदी उपस्थित होते.

श्रीमती रहाटकर म्हणाल्या की, महिलांसाठी प्रत्येक कामाचे ठिकाण हे सुरक्षितता, सन्मान आणि समान संधी देणारे असले पाहिजे. महिलांना सुरक्षित आणि भेदभावमुक्त कामाचे वातावरण मिळावे यासाठी ‘पॉश’कायद्याची प्रभावी अंमलबजावणी आणि नियमित ऑडिट होण्याची गरज आहे

सरकारी, खासगी, संघटित तसेच असंघटित क्षेत्रातील प्रत्येक स्थळी ‘ कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ प्रतिबंध, मनाई व निवारण कायद्याच्या तरतुदींची काटेकोर अंमलबजावणी करावी. महिलांसाठी सुरक्षित, सर्वसमावेशक आणि लिंग-संवेदनशील कार्य वातावरण निर्माण करण्यावर भर देण्यात यावा. अंतर्गत तक्रार समित्या प्रभावीपणे कार्यरत राहून कर्मचाऱ्यांमध्ये जनजागृती व्हावी. तक्रार निवारण प्रक्रियेत पारदर्शकता असावी, असेही निर्देश त्यांनी दिले.

जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी प्रास्ताविक केले. विविध आस्थापनांमधील तक्रार निवारण समितीचे अध्यक्ष कार्यशाळेत सहभागी झाले होते.

०००

संबंधित पोस्ट

ठाण्यात सायकल राईडमधून एचआयव्ही-एड्स जनजागृतीचा संदेश!

vishwatmaklokswamivarta

गुणवान आणि चारित्र्यवान चिकित्सकांचे निर्माण हा धन्वंतरी जयंतीचामुख्य उद्देश : डॉ. अरुण खैरे 

vishwatmaklokswamivarta

ऊसतोड कामगारांसाठीच्या कायद्याचा मसुदा संकेतस्थळावर प्रसिद्ध करून नागरिकांच्या सूचना मागवाव्यात – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

महाराष्ट्र आणि देशाच्या उभारणीत कामगारांचे मोलाचे योगदा – महिला व बालविकास मंत्री कु.आदिती तटकरे,महाराष्ट्र राज्य स्थापना दिनाचा मुख्य कार्यक्रम उत्साहात संपन्न

vishwatmaklokswamivarta

कौशल्य विषयक प्रशिक्षण उपक्रमांतून देहविक्रय करणा-या महिलांसाठी विकासाच्या नव्या संधी..

खोपोली येथे विशेष वित्तीय समावेशन शिबिर संपन्न रिझर्व्ह बँक अधिकाऱ्यांची उपस्थिती

vishwatmaklokswamivarta