vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जिल्ह्यात १९ जुलैपर्यंत कलम ३७ अन्वये मनाई आदेश लागू

जिल्ह्यात १९ जुलैपर्यंत कलम ३७ अन्वये मनाई आदेश लागू

 

गडचिरोली, प्रतिनिधी : जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ मधील कलम ३७(१)(३) अन्वये दिनांक ५ जुलै २०२६ रोजी रात्री १२.०१ वाजल्यापासून ते १९ जुलै २०२६ रोजी रात्री १२.०० वाजेपर्यंत संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात मनाई आदेश लागू करण्यात आला आहे

या कालावधीत शस्त्रे, स्फोटक किंवा दाहक पदार्थ बाळगणे, दगड अथवा इतर क्षेपणास्त्रे जमा करणे, चिथावणीखोर घोषणा, भाषणे, गाणी, फलक किंवा अन्य साहित्याद्वारे सार्वजनिक शांतता भंग होईल अशा कृती करण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे.

तसेच उपविभागीय दंडाधिकारी, कार्यकारी दंडाधिकारी किंवा संबंधित पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांची पूर्वपरवानगी घेतल्याशिवाय मिरवणुका, सभा किंवा सार्वजनिक कार्यक्रम आयोजित करता येणार नाहीत. तसेच पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींनी सार्वजनिक ठिकाणी एकत्र जमण्यासही मनाई करण्यात आली आहे.

जिल्ह्यात विविध राजकीय पक्ष, संघटना व इतरांकडून आंदोलन, मोर्चे किंवा सभा आयोजित होण्याची शक्यता लक्षात घेऊन हा आदेश जारी करण्यात आला असून, नागरिकांनी आदेशाचे पालन करून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हादंडाधिकारी अविश्यांत पंडा यांनी केले आहे.

संबंधित पोस्ट

मुंबई सीएसटी येथे स्टेशनवर  गोंधळ, दोन लोकल अचानक आमने-सामने, मोटरमन ने रेल्वे थांबवली, थोडक्यात टळला अपघात रेल्वे सेवा विस्कळीत

vishwatmaklokswamivarta

पावसाळी हंगामात मांडवा-गेटवे प्रवासी जलवाहतूक २६ मे ते ३१ ऑगस्टदरम्यान सेवा राहणार बंद 

केरोसीनचे टँकर प्राप्त झाले आहे. गोदाम व्यवस्थापकाच्या उपस्थितीत 12 हजार लिटर केरोसीन 124 परवानाधारकास वितरित

दिल्ली–सोनीपत विभागावर देशातील पहिल्या हायड्रोजन रेल्वेची यशस्वी चाचणी ..

कन्यादान योजनेंतर्गत अर्थसहाय्यासाठी स्वयंसेवी संस्थांना अर्ज करण्याचे आवाहन

धारावीत ज्येष्ठ नागरिकांसाठी छळवाद प्रतिबंध माहिती सत्र संपन्न*