vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

धारावीत ज्येष्ठ नागरिकांसाठी छळवाद प्रतिबंध माहिती सत्र संपन्न*

धारावीत ज्येष्ठ नागरिकांसाठी छळवाद प्रतिबंध माहिती सत्र संपन्न*

 

मुंबई प्रतिनिधी*धारावी,:* जागतिक ज्येष्ठ नागरिक छळवाद जनजागृती दिनाच्या पार्श्वभूमीवर धारावी येथील एल. टी. नगरमधील एकविरा मित्र मंडळात आज ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष माहिती सत्र पार पडले. ज्येष्ठ नागरिक झेंडा ग्रुप व फेस्कॉम मुंबई विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत हा उपक्रम राबवण्यात आला.

फेस्कॉमचे माजी अध्यक्ष शरद डिचोलकर यांनी 2007 च्या ‘आई-वडील व ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण कायदा’ व शासकीय योजनांबाबत मार्गदर्शन केले. धारावी पोलीस ठाण्याचे निरीक्षक वामन ठाकरे व उपनिरीक्षिका गाढवे यांनी ज्येष्ठांच्या संरक्षणासाठी कायदेशीर माहिती दिली. समाजसेवक महादेव शिंदे यांनी कुटुंबातील संवादाचे महत्त्व विशद केले.

कार्यक्रमाची सुरुवात साने गुरुजींच्या प्रार्थनेने झाली. यावेळी शिंदे परिवारातर्फे सर्व ज्येष्ठांना पावसाळी छत्र्यांचे वाटप करण्यात आले. मान्यवरांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान झाला.

संपर्क सचिव दिलीप गाडेकर, अध्यक्ष फेस्कॉम मुंबई विभाग सुरेश ईश्वर पोटे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या सत्रास मोठ्या संख्येने ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. सूत्रसंचालन दिलीप गाडेकर यांनी तर आभार परशुराम जाधव यांनी मानले. ज्येष्ठांवरील अन्याय रोखण्यासाठी कायद्याची जनजागृती हाच मुख्य उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले.

संबंधित पोस्ट

शिधावाटप विभागाच्या भरारी पथकाची मोठी कारवाई;वाडीबंदर परिसरातून ४५१ सिलिंडरसह ४० लाखांचा मुद्देमाल जप्त

शेवटच्या घटकाला न्याय मिळण्यासाठी प्रयत्न करावेत– आमदार संजय खोडके संपूर्णत: अभियानाचा सन्मान सोहळा

टपाल विभागात ‘डाक जीवन विमा’ प्रतिनिधींची भरती; 20 जानेवारीला मुलाखती

vishwatmaklokswamivarta

पावसाळ्यात झाडे पडणे ही केवळ नैसर्गिक घटना नाही; ती मानवनिर्मित आपत्ती !  सुराज्य अभियान,झाडांच्या मुळांची गळचेपी करून नागरिकांचा जीव धोक्यात घालणाऱ्यांवर ‘सदोष मनुष्यवधा’चा गुन्हा दाखल करा !

मतदार यादीवरील दावे-हरकतींसाठी ३० सप्टेंबरपर्यंत मुदत;एसआयआर अंतर्गत नमुना ६, ७ व ८ द्वारे अर्ज करण्याची संधी

vishwatmaklokswamivarta

रविवारी 1 फेब्रुवारी 2026  रोजी मध्य रेल्वेच्या उपनगरीय मार्गावर मेगाब्लॉक .

vishwatmaklokswamivarta