vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

व्यवसायातील समस्या व कराच्या बोजावर गंभीर चर्चामराठवाडा चेंबर ऑफ ट्रेड अँड कॉमर्सच्या संचालक मंडळाची बैठक

व्यवसायातील समस्या व कराच्या बोजावर गंभीर चर्चामराठवाडा चेंबर ऑफ ट्रेड अँड कॉमर्सच्या संचालक मंडळाची बैठक

जालना प्रतिनिधी: मराठवाड्यातील सर्व व्यापारी संघटनांची शीर्ष संघटना मराठवाडा चेंबर ऑफ ट्रेड अँड कॉमर्सची सहावी संचालक मंडळाची बैठक जालना शहरातील विजय विलास हॉटेल येथे सोमवारी मराठवाडा चेंबरचे अध्यक्ष आदेशपाल सिंग छाबडा यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. बैठकीच्या सुरुवातीस मराठवाडा चेंबरचे महासचिव शाम लोया यांनी मागील बैठकीचे इतिवृत्त वाचून दाखवले व त्याला मान्यता घेतली. तसेच कोषाध्यक्ष विकास साहूजी यांनी चेंबरचे आर्थिक ताळेबंद सादर केले व त्यास मान्यता घेतली. बैठकीत व्यवसायातील समस्या व कराचा बोजा याविषयी गंभीरतेने चर्चा करून या विषयाकडे सरकारचे लक्ष वेधण्याचे या बैठकीत ठरविण्यात आले.

महापालिका व नगरपालिका आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी सरकार त्यांना व्यापारी वर्गावर व जनतेवर आस्थापना कराच्या माध्यमातून नवीन कर लादण्याचा पुढील काळात प्रयत्न होणार आहे. महापालिकेच्या स्थापना करास व्यापारी संघटनेच्या माध्यमातून विरोध करण्याचा ठराव धर्माबाद येथे मराठवाडा चेंबर ऑफ ट्रेड अँड कॉमर्स च्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित व्यापार परिषदेत पास करून घेण्याचे बैठकीत ठरविण्यात आले. तसेच केंद्र सरकार व राज्य सरकार ग्रीन एनर्जीला प्रोत्साहन देत असताना सुद्धा महावितरण आस्थापनावर किंवा घरावर लावलेल्या सोलार एनर्जी सिस्टीम द्वारे उत्पन्न झालेल्या विद्युत युनिटवर ग्रीड सपोर्टिंग चार्ज १ रुपया ९२ पैसे प्रमाणे सोलार बसवणाऱ्या ग्राहकास आकारत असल्यामुळे व्यापारी वर्गाचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. व्यापारी वर्गाला विश्वासात न घेता महावितरण ने लावलेल्या या ग्रीड सपोर्टिंग चार्जेस बद्दल सरकारला जाब विचारण्याचे काम मराठवाडा चेंबर करणार आहे. जीएसटी २०१७ ला इम्प्लिमेंट झाल्यानंतर वन नेशन वन टॅक्स याप्रमाणेच टॅक्स राहील असे सरकारने व्यापारी वर्गाला आश्वासन दिले असताना सुद्धा अजूनही महाराष्ट्र सरकार व्यवसाय कर वसूल करत आहे. अजून तो रद्द झाला नाही. त्याबद्दल ही या बैठकीत नाराजी व्यक्त करण्यात आली. मराठवाडा चेंबरच्या वतीने ग्राहक व्यवहार अन्न व सार्वजनिक वितरण केंद्रीय राज्य मंत्री श्रीमती निमूबेन जयंतीभाई बांभनिया यांना मराठवाड्यातील व्यवसायातील अडचणींबाबतचे निवेदन दिले होते. सदरील मंत्रालयाने या निवेदनाची दखल घेऊन यावर काय उपाययोजना करता येईल याबद्दल मराठवाडा चेंबरच्या अध्यक्षांकडे विचारपूस केल्याबद्दल सर्वांनी समाधान व्यक्त केले. यावेळी जालना जिल्हा व्यापारी महासंघाने मराठवाडा चेंबरच्या सर्व पदाधिकाऱ्यांचा सत्कार केला. बैठकीस वरिष्ठ उपाध्यक्ष सुरेंद्र रेदासनी, माजी अध्यक्ष प्रफुल मालानी, गजाननराव घुगे, सूर्यकांत हाके पाटील, संजय मोदांनी, लक्ष्मीनारायण राठी, जफर मिर्झा, संदीप लाहोटी यांची उपस्थिती होती.

चौकट

धर्माबादेत २६ जुलैला व्यापार परिषदधर्माबाद येथे मराठवाडा चेंबरच्या २९ व्या वर्धापन दिनानिमित्त २६ जुलै रविवार रोजी भव्य व्यापार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यास मराठवाड्यातील सर्व व्यापाऱ्यांनी उपस्थित राहून व्यापारी वर्गाची एकजूट दाखवावी असेही आवाहन मराठवाडा चेंबरच्या पदाधिकाऱ्यांनी केले आह

संबंधित पोस्ट

जिल्ह्यातील पर्यटनाला मिळणार ‘होमस्टे’ची जोड; स्थानिकांना रोजगाराची संधी

vishwatmaklokswamivarta

नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील 501 धोकादायक इमारतींची यादी जाहीर*

निसर्गाच्या कुशीतून आलेल्या चविष्ट रानभाज्‌यांचा उत्सव – ठाण्यात रानभाज्या महोत्सव उत्साहात संपन्न

विद्यार्थ्यांच्या 11 वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेबाबत जिल्हा परिषद ठाणे शिक्षण विभागाकडून आवाहन*

रासायनिक दुर्घटनेचे आपत्ती व्यवस्थापन प्रात्यक्षिक; ३०० जणांचा सहभाग

vishwatmaklokswamivarta

नमुंमपा शाळेतील माजी विद्यार्थिनी पश्चिम विभागाची कर्णधार फुटबॉलपटू राबिया शेख यांचा आयुक्तांनी केला विशेष सत्कार…

vishwatmaklokswamivarta