vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

कृष्णा नदीच्या पाणीपातळीत वाढ शक्य; नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

कृष्णा नदीच्या पाणीपातळीत वाढ शक्य; नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

 

 सांगली, प्रतिनिधी: कृष्णा-कोयना-वारणा नद्यांच्या मुक्त पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पर्जन्यवृष्टीमुळे कृष्णा नदीच्या पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता असल्याने सांगली पाटबंधारे विभागाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे

 सांगली पाटबंधारे विभागाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनानुसार, दि. 9 जुलै 2026 रोजी सकाळी 8 वाजता कृष्णा नदीवरील आयर्विन पुल येथे पाणीपातळी 26 फूट 9 इंच इतकी आहे. दि. 8 जुलैच्या रात्री मुक्त पाणलोट क्षेत्रात पावसाचे प्रमाण जास्त होते. त्यामुळे कृष्णा नदीच्या आयर्विन पुलावरील पाणीपातळीत आणखी वाढ होऊन दि. 9 जुलैच्या रात्रीपर्यंत ती अंदाजे 30 ते 32 फूटांपर्यंत पोहोचण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. यामुळे नदीकाठच्या गावांतील ग्रामस्थ, शेतकरी व नागरिकांनी सतर्क राहावे, अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच प्रशासनाकडून वेळोवेळी दिल्या जाणाऱ्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन सांगली पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता सीमा मोहिते यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.

अधिक माहितीसाठी सांगली पाटबंधारे विभागाच्या पूर नियंत्रण कक्षाशी 0233-2301820, 2302925 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.

00000

संबंधित पोस्ट

घणसोली विभागातील 21 शाळांमधील 13 हजारहून अधिक विद्यार्थ्यांनी घेतली ‘मतदार जागरूक दूत’ महाप्रतिज्ञा..

vishwatmaklokswamivarta

पेण येथे पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा व मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना उमेदवार निवड मेळाव्याचे आयोजन

वाळू निर्गती धोरण 2025 चे प्रारुप-हरकती व सूचना मागविण्यासाठी प्रसिद्ध..

vishwatmaklokswamivarta

गेमिंग केवळ करमणूक नसून आगामी काळातडिजिटल परिवर्तनाचा मुख्य घटक ठरेल,· ‘बिलियन डॉलर बेट्स पॉवरेड बाय लुमिकाई इन्व्हेस्टर विव ऑन गेमिंग्स नेक्स्ट फ्रंटियर’ विषयावर चर्चासत्र..

स्वाधार योजनेअंतर्गत 16 मार्चपर्यंत अर्जांच्या त्रुटीची पूर्तता करण्याचे आवाहन                                               

महाराष्ट्र-आयोवा (अमेरिका) भागीदारीमुळे विविध क्षेत्रांमध्ये सहकार्याची नवी दारे खुली होणार– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

vishwatmaklokswamivarta