vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळाकडील योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन 

वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळाकडील योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन

            सांगली, प्रतिनिधी .) : वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळांतर्गत तसेच महामंडळाच्या उपकंपन्यांमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध कर्ज योजनांचा लाभ विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील पात्र नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक किरण गिऱ्हे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.

वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळामार्फत तसेच महामंडळाच्या पैलवान कै. मारुती चव्हाण-वडार आर्थिक विकास महामंडळ, राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळ, ब्रह्मलीन आचार्य दिव्यानंद महाराज आर्थिक विकास महामंडळ, श्रीकृष्ण आर्थिक विकास महामंडळ, विणकर समाज आर्थिक विकास महामंडळ तसेच श्री शिव गोरक्षनाथ समाज आर्थिक विकास महामंडळ या उपकंपन्यांमार्फत विविध योजनांसाठी सन २०२६-२७ या आर्थिक वर्षाकरीता प्रकरणे स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू आहे.

 

            महामंडळामार्फत बीज भांडवल कर्ज योजना, 1 लाख थेट कर्ज योजना, वैयक्तिक कर्ज योजना तसेच गट कर्ज योजना राबविण्यात येत आहेत. पात्र लाभार्थ्यांनी www.vnvjntdc.org⁠ या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

 

            योजनांबाबत अधिक माहितीसाठी वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ, सांगली जिल्हा कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, जुना बुधगाव रोड, संभाजी नगर, सांगली येथे किंवा दूरध्वनी क्र. ०२३३-२३७६३८३ वर संपर्क साधावा, असे प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे.

00000

संबंधित पोस्ट

होय, जैन समाजाच्या मनाप्रमाणेच निर्णय; धन्यवाद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

vishwatmaklokswamivarta

राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज मागविले

सेंट जॉर्ज रुग्णालयातील ज्येष्ठ डॉक्टर प्राध्यापक प्रख्यात स्त्रीरोगतज्ञ डॉक्टर राजेश्री दयानंद कटके यांना रविवारी यांना रविवारी ग्लोबल गायनिक अँड फर्टिलिटी 2025 हा पुरस्कार ने सन्मानित.

vishwatmaklokswamivarta

वारणा धरणात 28.54 टी.एम.सी. पाणीसाठा- कोयना धरणातून 5500 क्युसेक्स तर वारणा धरणातून 8530 क्युसेक्स विसर्ग सुरू

मानवी जाणिवा कायम ठेवून प्रशासकीय कामकाज करा- ॲड. धर्मपाल मेश्राम पारधी समाज बांधवांची विविध विषयावर निवेदने, मागण्या सादर..

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2024ची अंतिम उत्तरसूची प्रसिद्ध-