vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

शिर्डी: साईबाबा मंदिर परिसरात खाद्य विक्रेत्या महिलेची चाकूने हत्या; दोन तरुणींना पोलिसांनी ताब्यात घेतले.

शिर्डी साईबाबा मंदिर परिसरात खाद्य विक्रेत्या महिलेची चाकूने हत्या; दोन तरुणींना पोलिसांनी ताब्यात घेतले.

 राज्य प्रतिनिधी-

शिर्डीत व्यवसायाच्या जागेवरून झालेल्या किरकोळ वादानंतर फळविक्रेत्या महिलेची चाकूने भोसकून निर्घृण हत्या करण्यात आली. शिर्डी पोलिसांनी अवघ्या काही तासांत कारवाई करत दोन संशयित महिलांना अटक केली आहे.

 सूत्रांचे मिळाले माहितीनुसार,घटनेची महिलेचे नाव: जयश्री साईनाथ क्षीरसागर (वय ३०).ठिकाण: श्री साईबाबा समाधी मंदिराच्या प्रवेशद्वार क्रमांक ४ जवळ, शिर्डी.वेळ: रविवारी (१९ जुलै) रात्री १० च्या सुमारास.आरोपी: फिजा पटेल (मुख्य संशयित) आणि अंजली खंडीझोड.हत्येचे कारण:जयश्री क्षीरसागर या मंदिर परिसरात डाळिंब आणि काकडी विकण्याचा व्यवसाय करत होत्या. त्याच परिसरात किरकोळ वस्तू व स्टिकर विकणाऱ्या आरोपी महिलांसोबत त्यांना बसण्याच्या जागेवरून वाद झाला. हा वाद शिगेला पोहोचल्यानंतर आरोपी फिजा पटेल हिने जयश्री यांच्यावर धारदार चाकूने सपासप वार केले.

पोलिसांची कारवाई:हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या जयश्री यांना स्थानिक नागरिकांनी साईबाबा रुग्णालयात दाखल केले होते. उपचारादरम्यान सोमवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाला.पोलिसांनी मुख्य संशयित आरोपी फिजा पटेल आणि कटात सहभागी असलेली अंजली खंडीझोड या दोन्ही तरुणींना ताब्यात घेतले आहे.शिर्डी शहर पोलीस ठाण्यात हत्येचा (BNS कलम १०३) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संपूर्ण घटना सीसीटीव्ही (CCTV) मध्ये कैद झाली असून पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.प्रशासनाचा निर्णय:शिर्डीतील वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शिर्डीतील रस्त्यांवर आणि फुटपाथवर विक्रेत्यांना बंदी घालण्याचे निर्देश दिले आहेत. गुन्हेगारी रोखण्यासाठी शहरात कडक पावले उचलण्यात येत आहेत.

संबंधित पोस्ट

ठाण्यात १२ वा आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजराआमदार निरंजन डावखरे, उपमहापौर कृष्णा पाटील आणि जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांच्या उपस्थितीत नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग

सिंधुदुर्गात पर्यटन विकासाला चालना; फाईव्ह स्टार हॉटेल प्रकल्पाला गती द्यावी – मंत्री नितेश राणे

vishwatmaklokswamivarta

मराठा आरक्षण उपसमितीची बैठक संपन्न !

दिवाळी पहाट’ कार्यक्रम दादरला २१, मुलुंड येथे २२ ऑक्टोबरला

vishwatmaklokswamivarta

विधानसभा प्रश्नोत्तर :-थॅलेसेमिया मुक्तीसाठी राज्यात जनजागृतीपर विशेष कार्यक्रम- आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे- बोर्डीकर

vishwatmaklokswamivarta

मुंबई सह उपनगरात धावणार अत्याधुनिक वंदे-मेट्रो लोकल

vishwatmaklokswamivarta