
*महाराष्ट्र बंद पुकारण्याची महाविकास आघाडी ची भूमिका चुकीची; सरकारच राज्यात बंद कसा पुकारू शकते? — केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले*
मुंबई प्रतिनिधी – महाविकास आघाडी विरोधाला विरोध करण्याच्या राजकारणात इतके मश्गुल आहे की त्यांना भान राहिलेले नाही के ते राज्यात सरकार चालवीत आहेत. राज्य सरकार स्वतःच राज्यात बंद कसा पुकारू शकतात? सरकार ने बंद पुकारने ही महाविकास आघाडी ची चुकीची भुमीका आहे.त्याचा त्यांनी पुनर्विचार करावा.असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी केले. महाविकास आघाडी तर्फे महाराष्ट्र् बंद पुकारण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर ना रामदास आठवले यांनी राज्यात सरकार चालविणारे महाराष्ट्र् बंद कसा पुकारू शकतात असा सवाल केला आहे.



