vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर 22 जुलैला सांगलीत – नागरिकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहून या अभियानाचा लाभ घेण्याचे आवाहन 

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर 22 जुलैला सांगलीत

– नागरिकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहून या अभियानाचा लाभ घेण्याचे आवाहन

             सांगली, प्रतिनिधी ) : महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागामार्फत मुख्यमंत्री यांच्या जन्मदिनाचे आणि माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजित पवार यांच्या जयंतीचे औचित्य साधून राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघांमध्ये ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर’ आयोजित करण्यात येत आहे. 282 सांगली विधानसभा मतदारसंघातील नागरिकांसाठी हे विशेष शिबीर दि. 22 जुलै 2026 रोजी सकाळी 8.30 ते सायंकाळी 6 पर्यंत मल्हार हॉल, बालाजी मिल रोड, शिवाजीनगर, सांगली येथे आयोजित करण्यात आले आहे. या अभियानास राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभणार असल्याची माहिती मिरज उपविभागीय अधिकारी विशाल यादव आणि सांगली अप्पर तहसिलदार अश्विनी वरूटे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे.     या अभियानास खासदार विशाल पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, महापौर धीरज सूर्यवंशी, जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष, अपर जिल्हाधिकारी सुशांत खांडेकर उपस्थित राहणार आहेत.

            या अभियानाचा उद्देश महसूल विभाग अधिक लोकाभिमुख, पारदर्शक व गतिमान करून शासनाच्या योजनांचा लाभ तळागाळातील शेवटच्या नागरिकांपर्यंत पोहोचविणे हा आहे. या अभियानामध्ये महिलांना शेतकरी दर्जाचे प्रमाणपत्र वाटप, गावठाणातील नागरिकांना स्वामित्व सनद वाटप, मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजना, शासकीय जमिनीवरील निवासी अतिक्रमणे नियमित करणे, राजमाता जिजाऊ महिला सक्षमीकरण योजना, घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांसाठी विशेष तरतूद, शेतजमिनीच्या कौटुंबिक वाटणीपत्रावरील नोंदणी फी माफी, लोकसेवा हक्क कायद्यानुसार विविध दाखल्यांचे वितरण, भूसंपादन प्रकरणांतील कमी-जास्त पत्रके तयार करून दप्तर अद्ययावत करणे, सातबारा मधील त्रुटींची दुरूस्ती करून दूरूस्त सातबारा देणे, जिवंत सातबारा मोहिमेंतर्गत वारस नोंदी, पात्र अ.पा.क. नोंदी कमी करणे, ए.कु.में. नोंदी कमी करणे, नजर गहाण इत्यादी नोंदीबाबत कार्यवाही, डिजीटल सातबाऱ्याच्या कायदेशीर वैधतेबाबत जनजागृती करणे, अकृषक तरतुदीतील सुधारणांबाबत मार्गदर्शन करणे, ई-मोजणी सेवा, ॲग्रीस्टॅक नोंदणी, पी. एम. योजनेशी संबंधित कामे इत्यादी विविध विभागांकडून लाभ देण्यात येणार आहे.

            याशिवाय केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ आणि सेवा हमी कायद्यानुसार देय असलेल्या सेवांचा लाभ नागरिकांना घेता येईल. मिरज तालुक्यातील प्रत्येक विभागाचा एक स्टॉल लावण्यात येणार आहे. या शिबीरामध्ये जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सभापती व सदस्य, सरपंच व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित राहणार असून 282 सांगली विधानसभा मतदारसंघातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या अभियानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन मिरज उपविभागीय अधिकारी विशाल यादव आणि सांगली अप्पर तहसिलदार अश्विनी वरूटे यांनी केले आहे.

00000

संबंधित पोस्ट

पाळीव श्वान मालकांनी श्वान परवाना घेणे बंधनकारक

पालघरमध्ये भीषण दुर्घटना प्रक्रिया मुंबई-बडोदा एक्सप्रेसवेच्या पुलाला हायवा ट्रकची जोरदार धडक, चालक गंभीर

सैनिक कल्याण विभागात लिपीक टंकलेखकांची भरती; 26 नोव्हेंबरपर्यंत अर्ज करण्याची मुदत..

vishwatmaklokswamivarta

नवी मुंबई महानगरपालिकेच्या पदभरतीत कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) संवर्गाच्या पदसंख्येत वाढ – पात्र उमेदवारांना अर्ज करण्याचे आवाहन* 

जालना मनपाच्या विभागांना जिल्हाधिकारी तथा आयुक्त आशिमा मित्तल यांनी दिला कालबद्ध कार्यक्रम

vishwatmaklokswamivarta

ज्यांच्याकडे कन्यारत्न आहे त्याला कशाही कमी नाही-राहुल महाराज जोशीहभप प्रा. उध्दव महाराज वाघमारे यांचे आज हरिकिर्तन…

vishwatmaklokswamivarta