vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

बा.. विठ्ठला भरपूर पाऊस पडू दे.. व आवर्षणाचे संकट दूर कर..! माजीनगराध्यक्ष भास्करराव अंबेकर यांचे विठूरायाला साकडे

बा.. विठ्ठला भरपूर पाऊस पडू दे.. व आवर्षणाचे संकट दूर कर..! माजीनगराध्यक्ष भास्करराव अंबेकर यांचे विठूरायाला साकडे

जालना, प्रतिनिधी,  जालना शहरातील यशवंत नगर येथीलविठ्ठल-रुक्मिणी मंदिरात माजी नगराध्यक्ष भास्करराव अंबेकर व त्यांच्यासुविध्या पत्नी शोभाताई अंबेकर यांच्या हस्ते आषाढी एकादशी निमित्तसपत्नीक महाआरती-महापूजा करण्यात आली. यावेळी त्यांनी श्रीविठ्ठलाच्या

चरणी बा.. विठ्ठला..भरपूर पाऊस पडू दे.. अवर्षणाचे संकट दूर कर ..!आकाशाकडे डोळे लावून बसलेल्या बळीराजाला व सामान्य जनतेला सुखी करण्याचीप्रार्थना केली. यावेळी प्राचार्य डॉ.राजेंद्र गायकवाड,प्रा.डॉ.नारायणराव बोराडे, डॉ.मधुकर गरड, नरेंद्र वझरकर, सुभाषराव डीघे,अशोकराव देशमुख, मधुकर सिनगारे, सतीश जाधव यांच्यासह आदी नागरिकांचीउपस्थिती होती.      महापूजेनंतर माजी नगराध्यक्ष भास्करराव अंबेकर यांनी तेथीलकॉलनीवासीयांच्या वतीने विकसित केलेल्या ओपन स्पेस ची पाहणी केली.नागरिकांनी स्वत:च्या व मिळालेल्या निधीचा अत्यंत चांगला वापर करून तसेचआपल्या जवळ जे आहे त्यातील थोडे समाजासाठी देण्याच्या भावनेतून सभामंडप,अभ्यासिका, सांस्कृतिक उपक्रम, डान्स क्लासेस, मोठ्या प्रमाणात करण्यातआलेली वृक्ष लागवड अशा अत्यंत आदर्श पद्धतीने नागरिकांनी कॉलनीतील ओपनस्पेस विकसित केल्याचे दिसून आले. तसेच परिसरातील सर्व लहान-थोर नागरिकवेगवेगळ्या सण-उत्सव व कार्यक्रम प्रसंगी एकत्र येत असल्याने अत्यंतचांगले सामाजिक सौहार्दाचे वातावरण तेथे अनुभवण्यास मिळते. याबद्दल तेथीलनागरिकांचे कौतुक केले.

    तसेच सेवानिवृत्तीनंतरही अत्यंत तळमळीने काम करणारेप्रा.श्री.नारायण बोराडे यांचेही माजी नगराध्यक्ष भास्करराव अंबेकर यांनीविशेष कौतुक केले. त्यांनी आपल्या सार्वजनिक जीवनात आलेल्या सर्वपक्षीयनेत्यांच्या संबंधांचा उपयोग करून सर्व पक्षीय लोकप्रतिनिधींकडून येथीलविकास कामांसाठी निधी मिळवला तर अनेक प्रसंगी स्वत: ही खर्च केलाअसल्याचे अंबेकर यांनी नमूद केले. यावेळी श्री.भास्करराव अंबेकर यांनीआमदार अर्जुनराव खोतकर यांच्याशी संपर्क साधून तेथे आणखी काही विकासकामांसाठी पाच लक्ष रुपयाचा निधी उपलब्ध करून देण्याची विनंती केली असताआमदार खोतकर यांनी तात्काळ विनंती मान्य करून निधी देणार असल्याचे सांगितले.

संबंधित पोस्ट

सर्वांसाठी न्याय.. जलद न्याय ‘ या तत्वावर राज्य शासन काम करीत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक जाहीर

vishwatmaklokswamivarta

बेस्ट बसने प्रवास करणे महाग …बेस्ट बस भाडे दुप्पट  ९ मे २०२५ पासून लागू होईल. या वाढीव भाड्याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खर्चावर

महिला सक्षमीकरणासाठी शाश्वत रोजगार क्लस्टर उभारणीवर भर; स्थानिक उद्योगांसाठी कौशल्ययुक्त मनुष्यबळ तयार करा : जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा**आरमोरी येथे बारदाना निर्मिती उद्योगाच्या उद्घाटन*

पक्षकारांच्या न्यायासाठी नवोदित वकिलांनी सतत अध्ययन करावे -न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे जुन्नर येथील जुन्या न्यायालयाच्या इमारतीचा विकास आराखडा तयार करा-उपमुख्यमंत्री अजित पवार

vishwatmaklokswamivarta

इंडिया एआय इम्पॅक्ट शिखर परिषदेतल्या निदर्शनांप्रकरणी भारतीय युवा काँग्रेस राष्ट्रीय अध्यक्ष उदय भानू चिब अटकेत.