vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

कोकण विभागात पावसाचा जोर कायम: सरासरीच्या ६४.८२ टक्के पर्जन्यमानाची नोंद…

कोकण विभागात पावसाचा जोर कायम: सरासरीच्या ६४.८२ टक्के पर्जन्यमानाची नोंद…

नवी मुंबई, प्रतिनिधी:- कोकण विभागात आतापर्यंत विभागाच्या वार्षिक सरासरीच्या तब्बल ६४.८२ टक्के पावसाची नोंद झाली आहे. महावेध संकेतस्थळावरून २७ जुलै २०२६ रोजी प्राप्त झालेल्या अधिकृत आकडेवारीनुसार, कोकण विभागात आतापर्यंत एकूण १७१५.८१ मि.मी. सरासरी पाऊस झाला आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत (२७ जुलै २०२५ पर्यंत) विभागात १३२९.०६ मि.मी. पावसाची नोंद झाली होती. गतवर्षाच्या तुलनेत यंदा कोकणात पावसाचे प्रमाण लक्षणीयरीत्या अधिक आहे.

रायगड जिल्ह्यात आतापर्यंत सर्वाधिक २०१२.८० मि.मी. (६०.९३ टक्के) पावसाची नोंद झाली आहे. तर मुंबई उपनगर जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या सर्वाधिक ७९.१० टक्के (१८९५.९० मि.मी.) पाऊस पडला आहे. ठाणे जिल्ह्यात ६९.१० टक्के (१६६९.१० मि.मी.) आणि पालघर जिल्ह्यात ७४.२१ टक्के (१७९२.५० मि.मी.) पर्जन्यमान झाले आहे. मुंबई शहरात वार्षिक सरासरीच्या ७४.५५ टक्के म्हणजेच १६००.०० मि.मी. पाऊस नोंदवला गेला आहे.

दक्षिण कोकणात मात्र पावसाचा जोर काहीसा ओसरल्याचे चित्र आहे. रत्नागिरी जिल्ह्यात आतापर्यंत ५२.३१ टक्के (१७५९.९० मि.मी.) पाऊस झाला आहे. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात ४३.५५ टक्के म्हणजेच १२८०.५० मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.

***

संबंधित पोस्ट

जुन्या वाहनांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसविण्यासाठी दि.30 जून 2025 पर्यंत मुदतवाढ…

vishwatmaklokswamivarta

सोमवारी शिक्षण उपसंचालक यांच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन विमाशि संघाचे प्रलंबित समस्‍यांबाबत आंदोलन…

vishwatmaklokswamivarta

पेण तालुक्यातील खारेपाट येथीलपाणी टंचाईवर कायमस्वरूपी उपाययोजना करणार- मंत्री गुलाबराव पाटील

मलकापूर तालुक्यातील सरपंच पदाचे आरक्षण; 16 एप्रिला सोडत…

एआय तंत्रज्ञान आधारित प्रणालीमुळे राज्यात दुसरी निल क्रांती- नितेश राणे

vishwatmaklokswamivarta

भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या मुंबई इथल्या प्रादेशिक केंद्राने पंढरीची वारी पदयात्रेच्या माध्यमातून शारिरीक तंदुरुस्ती आणि सांस्कृतिक सलोख्याचा केला प्रसार घोषणा आणि प्रत्यक्ष संवादाच्या माध्यमातून फिट इंडिया चळवळीला दिले प्रोत्साहन

vishwatmaklokswamivarta