vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्य

जागतिक कावीळ दिनानिमित्त जालना शहरात जनजागृती रॅली

जागतिक कावीळ दिनानिमित्त जालना शहरात जनजागृती रॅली

जालना,द प्रतिनिधी) : जागतिक कावीळ दिनानिमित्त जिल्हा रुग्णालय, जालना आणि सनराईज शुद्ध शाकाहारी रेस्टॉरंट, जालना यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी जालना शहरात कावीळ आजाराबाबत जनजागृती करण्यासाठी रॅलीचे आयोजन करण्यात आले. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र एस. पाटील यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून रॅलीचा शुभारंभ करण्यात आला.”चला तर कावीळ मुक्त करूया” या घोषवाक्याखाली आयोजित करण्यात आलेल्या या रॅलीद्वारे नागरिकांना कावीळ आजाराची कारणे, प्रतिबंधात्मक उपाय, वेळेवर निदान आणि उपचार याबाबत माहिती देण्यात आली. शहरातील प्रमुख मार्गावरून रॅलीचे आयोजन करण्यात आले होते..

यावेळी मार्गदर्शन करताना अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र गाडेकर यांनी सांगितले की, सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत कावीळ आजार नियंत्रणासाठी विविध उपक्रम प्रभावीपणे राबविले जात आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने 2030 पर्यंत कावीळ निर्मूलनाचे उद्दिष्ट निश्चित केले असून, ते साध्य करण्यासाठी जनजागृती, लसीकरण आणि लोकसहभाग अत्यंत महत्त्वाचा असल्याचे त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमादरम्यान जिल्हा रुग्णालयातील सुमारे 100 वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कावीळ प्रतिबंधक लसीकरण करण्यात आले. या उपक्रमात सनराईज रेस्टॉरंटचे संचालक मोहन इंगळे, डॉ. प्रदीप कुलकर्णी, डॉ. प्रकाश पाटोदेकर, डॉ. प्रशांत बांदल, डॉ. रवींद्र बेदरकर, डी. एच. बोर्डे, नितीश जाधव, संदीप लुखे, संतोष इंगळे, विद्या म्हस्के, चंद्रकांत मुंढे, विजय पवार, कांबळे, अमोल पेरकर, सोनाजी भुतेकर, दीपक जाधव तसेच जिल्हा परिचर्या प्रशिक्षण केंद्र, जालना येथील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

-*-*-*-*-*-

संबंधित पोस्ट

विशेष वृत्त :सेरेब्रल पाल्सीग्रस्त मुलांच्या आयुष्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून नवसंजीवनी..

कायदेविषयक शिबीरात कुष्ठरोगाबाबत जनजागृती

लहान मुलांसाठी कफ सिरपच्या वापरासंबंधी केंद्र सरकारची नवी मार्गदर्शक तत्त्वे जारी

शहापूर तालुक्यातील वाशाळा येथे १०३ गरोदर मातांना मोफत सुकामेवा वाटप प्रतीक्षा झावर फाउंडेशन आणि ग्रामीण विभाग वैद्यकीय सेवा संस्थेचा कुपोषण निर्मूलनासाठी स्तुत्य उपक्रम.

लम्पी आजाराच्या व्यवस्थापनाकरिता वेळीच करा उपाययोजना; कृषि विज्ञान केंद्राचे आवाहन

माझे गाव, आरोग्य संपन्न गाव’ गीतातून जनजागृतीचा संदेश; उदयनगर येथे CPHC प्रशिक्षण उत्साहात