vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

नशा मुक्त भारत अभियान २०२६’ अंतर्गतठाण्यात जिल्हास्तरीय विविध स्पर्धा उत्साहात संपन्न

नशा मुक्त भारत अभियान २०२६’ अंतर्गतठाण्यात जिल्हास्तरीय विविध स्पर्धा उत्साहात संपन्न

ठाणे, प्रतिनिधी) :- युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय, भारत सरकार यांच्या मेरा युवा भारत (MY Bharat) – ठाणे तथा नॅशनल कॅडेट कॉर्प्स (NCC) यांच्या संयुक्त विद्यमाने ‘नशा मुक्त भारत अभियान २०२६’ अंतर्गत “नशा मुक्त युवा फॉर विकसित भारत” या संकल्पनेवर आधारित जिल्हास्तरीय विविध स्पर्धांचे आयोजन VPM’s B. N. Bandodkar College, ठाणे येथे उत्साहात पार पडले

कार्यक्रमाचे उद्घाटन प्रसिद्ध मराठी अभिनेते कुशल भद्रिके, अभिजित चव्हाण आणि संतोष जुवेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी VPM’s B. N. Bandodkar College, ठाणे येथील प्राचार्य प्रा. डॉ. विंदा मांजरमकर तसेच उपप्राचार्या प्रा. प्रीती जांभुळकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. उपस्थित मान्यवरांनी युवकांना व्यसनमुक्त जीवनशैलीचा स्वीकार करून “नशा मुक्त युवा फॉर विकसित भारत” या अभियानात सक्रिय सहभाग नोंदविण्याचे तसेच विकसित भारताच्या निर्मितीत योगदान देण्याचे आवाहन केले.

या स्पर्धांमध्ये जिल्ह्यातील १५ ते २९ वर्षे वयोगटातील युवक-युवती, महाविद्यालयीन विद्यार्थी, युवक मंडळे तसेच स्वयंसेवकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. स्पर्धांमध्ये संगीत व रॅप (गट), थीमॅटिक नृत्य (गट), रील मेकिंग व लघुपट निर्मिती, नुक्कड नाटक, स्लॅम पोएट्री, वादविवाद/वक्तृत्व, चित्रकला तसेच घोषवाक्य लेखन अशा एकूण आठ स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.

स्पर्धकांनी आपल्या कलागुणांच्या माध्यमातून व्यसनमुक्त भारताचा प्रभावी संदेश समाजापर्यंत पोहोचविला. स्पर्धांमधील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विजेत्यांना मेरिट प्रमाणपत्र व पदक देऊन गौरविण्यात आले, तसेच सर्व सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले

प्रत्येक स्पर्धेतील प्रथम क्रमांक प्राप्त स्पर्धक राज्यस्तरीय स्पर्धेत ठाणे जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार असून, राज्यस्तरावर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या स्पर्धकांना राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळणार आहे.या उपक्रमाच्या माध्यमातून युवकांमध्ये व्यसनमुक्तीबाबत व्यापक जनजागृती घडून आली असून “नशामुक्त भारत – विकसित भारत” या राष्ट्रीय अभियानाला अधिक बळकटी मिळाली.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनात MY Bharat – ठाणेच्या जिल्हा युवा अधिकारी श्रीमती मनीषा शर्मा यांचे विशेष योगदान लाभले. त्यांच्या कुशल मार्गदर्शन, प्रभावी समन्वय आणि नेतृत्वाखाली संपूर्ण स्पर्धांचे यशस्वी आयोजन व संचालन करण्यात आले.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी MY Bharat – ठाणे, नॅशनल कॅडेट कॉर्प्स (NCC), VPM’s B. N. Bandodkar College, सर्व मान्यवर, स्वयंसेवक, स्पर्धक तसेच सहकार्य करणाऱ्या सर्व संस्था यांचे आभार व्यक्त करण्यात आले.

 

0000000000

 

 

संबंधित पोस्ट

डॉ. चित्तरंजन पुरंदरे यांचे वैद्यकीय क्षेत्रातील योगदान प्रेरणादायी – मंत्री छगन भुजबळ प्रा. डॉ. पुरंदरे यांचा गौरव सोहळा व ‘हँड्स दॅट हील्ड, अ हार्ट दॅट लेड’ आत्मचरित्राचे प्रकाशन

रविवारी कळव्यात रंगणार शिमगोत्सव आणि पालखी नृत्यस्पर्धा*

जलसंधारणासाठी जालन्यात एकजूट; ‘महा वॉकेथॉन’ला उत्स्फूर्त प्रतिसाद जलसंधारण दिनानिमित्त ‘महा वॉकेथॉन’ संपन्न

मराठी न शिकविणाऱ्या शाळांवर दंडासह मान्यता रद्द करण्याची कारवाई- शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

परवानाधारकाकडील शस्त्रे पोलीस स्टेशनमध्ये जमा करण्याचे जिल्हादंडाधिकारी डॉ. किरण पाटील यांचे निर्देश • शस्त्रे जमा करण्यासंदर्भात मार्गदर्शक सूचना

vishwatmaklokswamivarta

जालना जिल्ह्यातील मोडकळीस आलेल्या  शाळांवर बाल हक्क आयोगाची थेट कारवाई मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकाऱ्यांना अर्धन्यायिक सुनावणीचे समन्स,विद्यार्थ्यांच्या जीविताला धोका, वृत्तांची ‘सुओ-मोटो’ दखल७ ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयात सुनावणी, अहवाल न दिल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा