vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी ई-केवायसीची गती वाढवावी- जिल्हाधिकारी आशिष येरेकर

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी ई-केवायसीची गती वाढवावी- जिल्हाधिकारी आशिष येरेकर

अमरावती, प्रतिनिधी : जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची पहिली यादी प्रसिद्ध झाली आहे. लवकरच उर्वरीत शेतकऱ्यांची यादी येणार आहे. त्यामुळे रविवारपर्यंत जिल्ह्यातील पहिल्या यादीतील 76 हजार 976 शेतकऱ्यांची ई-केवायसी गतीने पूर्ण करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी दिले.जिल्हाधिकारी कार्यालयात आज तालुकास्तरावरील सहायक निबंधक आणि बँकांचे प्रतिनिधी यांचा आढावा घेण्यात आला. यावेळी जिल्हा उपनिबंधक राजेश भुयार, अग्रणी जिल्हा बँक व्यवस्थापक नरेश हेडाऊ आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी कर्जमाफीची प्रक्रिया राबविताना बँकांनी सजगपणे काम करणे आवश्यक आहे. बँकेच्या शाखेमधून प्रत्येक कर्जदार शेतकऱ्यांना दूरध्वनी करून त्यांना कर्जमाफीची माहिती देण्यात यावी. त्यांच्या शंकांचे निरसन करण्यात यावे. शेतकऱ्यांना प्रामुख्याने २ लाख रूपयांची कर्जमाफी होणार आहे, याबाबत माहिती देण्यात यावी. कर्जमाफी होण्यासाठी ॲग्रीस्टॅक हा महत्वाचा आहे. ॲग्रीस्टॅक नोंदणी नसल्यास तातडीने ही नोंदणी करण्यास शेतकऱ्यांना सांगावे. याकामी बँकांनी प्रयत्नपूर्वक कार्य करणे अपेक्षित आहे.

कर्जमाफीच्या अनुषंगाने येत्या शनिवार आणि रविवारी बँकांचे कामकाज सुरू ठेवण्यात यावे. याकामी स्वतंत्ररित्या दोन नोडल अधिकारी यांची नियुक्ती करण्यात यावी. त्यांच्याकडून कर्जमाफीबद्दल योग्य मार्गदर्शन करण्यात यावे. कर्जमाफीच्या प्रक्रियेत शेतकऱ्यांची सहमती घेताना त्यांना कर्जाच्या रकमेमध्ये फरक दिसत असला तरी उर्वरीत रक्कम बँक समायोजित करीत असल्याची माहिती देण्यात यावी. कर्जमाफीच्या प्रक्रियेत काही तक्रारी असल्यास त्या तात्काळ कळविण्यात याव्यात. त्यानुसार डाटामध्ये दुरूस्ती करण्यात यावी.

जिल्ह्यात अद्यापही 76 हजार 976 ई-केवायसीपैकी 43 हजार 432 शेतकऱ्यांची ई-केवायसी प्रलंबित आहे. आपले सरकार केंद्र येथे शेतकऱ्यांची ही केवायसी मोफत होणार आहे. केंद्र चालकांनी शेतकऱ्यांकडे पैशाची मागणी केल्यास केंद्राचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्यात येणार आहे. तसेच कर्जमाफीसाठी ई-केवायसीसाठी आलेल्या शेतकऱ्यांना प्राधान्य देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी दिल्या.

Amravati Collector

संबंधित पोस्ट

सोसायटी अचिव्हर्स’च्या कव्हर पेजवर मंत्री पंकजा मुंडे! ‘इथिकल लीडरशीप’च्या कार्याची दखल

बीडमधील हत्येप्रकरणी बातमी; दोन मुख्य आरोपींना अटक, संतोष देशमुखांचं लोकेशन देणाराही ताब्यात..

राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवड्यानिमित्त* *जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी कार्यालयाकडून शिबीरांचे आयोजन*

vishwatmaklokswamivarta

यशवंतराव चव्हाण यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

पाथरी तीर्थक्षेत्र विकास आराखड्याची कामे तातडीने सुरू करा – राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यातील १ लाख ४० हजार शेतक-यांनी डाउनलोड केले महाविस्तार AI अप कराड तालुका राज्यात प्रथम ३०,००० शेतक-यांनी केले ॲप डाउनलोड*