vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

शोषितांच्या हक्कासाठी अण्णाभाऊंचे विचार प्रेरणादायी: सतीशराव घाटगे,अंतरवाली टेंभी येथे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती सोहळा उत्साहात..

शोषितांच्या हक्कासाठी अण्णाभाऊंचे विचार प्रेरणादायी: सतीशराव घाटगे,अंतरवाली टेंभी येथे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती सोहळा उत्साहात..

घनसावंगी प्रतिनिधी: शोषित, वंचित आणि कष्टकरी समाजाच्या वेदनांना आपल्या लेखणीच्या आणि शाहिरीच्या माध्यमातून आवाज देणारे साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त धनंजय आप्पा कोल्हे मित्र मंडळ व अंतरवाली टेंभी ग्रामस्थांच्या वतीने आयोजित जन्मोत्सव सोहळा उत्साहात पार पाडला. या कार्यक्रमास समृध्दी साखर कारखान्याचे चेअरमन सतीशराव घाटगे, आझाद क्रांती सेनेचे प्रमुख श्री. राजेशभाऊ घोडे, श्री. धनंजय आप्पा कोल्हे यांची प्रमुख उपस्थिती होती.

मान्यवरांच्या उपस्थितीत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास अभिवादन केले. तसेच उपस्थित समाजबांधवांशी संवाद साधला. यावेळी शाळकरी विद्यार्थ्यांनी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याचा आपल्या भाषणातून जागर केला.

यावेळी सतीश घाटगे यांनी आपल्या भाषणात अण्णाभाऊंनी आपल्या साहित्याच्या माध्यमातून समाजातील उपेक्षित घटकांच्या व्यथा मांडतानाच, स्वाभिमान, समता आणि परिवर्तनाची ज्वाला पेटवली. त्यांचे विचार केवळ इतिहासाचा भाग नसून, आजही सामाजिक न्यायापासून वंचित असलेल्या शोषित घटकांना त्यांचा हक्क मिळवण्यासाठी आणि समानतेच्या वाटचालीसाठी प्रेरणादायी असल्याचे मत व्यक्त केले. अण्णाभाऊ साठे यांच्या परिवर्तनवादी विचारांचा वारसा जपत समाजातील शेवटच्या घटकापर्यंत विकास आणि न्याय पोहोचविण्यासाठी आपण सर्वांनी कटिबद्ध राहूया. वंचित, शोषित घटकांच्या न्याय आणि हक्काच्या लढ्यात मी कायम सोबत राहीन, असा विश्वास त्यांनी दिला.

या कार्यक्रमांसाठी विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन श्री धनंजय कोल्हे, जावेद शेख, भाजपा कार्यकर्ते संदीप शर्मा, पांडुरंग पाटोळे, काकासाहेब नळगे, साहेबराव कांबळे यांच्यासह धनंजय आप्पा कोल्हे मित्र मंडळाच्या सदस्त्यानी परिश्रम घेतले.

या जयंती उत्सव सोहळ्यासआझाद क्रांती सेनेचे प्रमुख श्री. राजेशभाऊ घोडे, श्री. धनंजय आप्पा कोल्हे, भाजपाचे ओबीसी मोर्चाचे तालुका अध्यक्ष माधव टेहळे, समृद्धी साखर कारखान्याचे संचालक रंजित उढाण, स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते, गावातील तरुण मित्र व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संबंधित पोस्ट

वाराणसीमध्ये फिट इंडिया संडेज ऑन सायकल उपक्रमादरम्यान केंद्रीय मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी तरुणांना तंदुरुस्त आणि ड्रग्जमुक्त भारतासाठी सायकलिंग करण्यासाठी दिले प्रोत्साहन

केंद्रीय गृहनिर्माण व नगरविकास विषयक स्थायी समितीच्या सदस्यांसह खासदार नरेश म्हस्के यांची तामिळनाडूचे मुख्यमंत्री विजय थलपती यांच्या समवेत बैठकशहरी व्यवस्थापनाचा घेतला आढावा,केंद्रीय समितीच्या खासदारांसह खासदार नरेश म्हस्के यांचे विजय थलपती यांनी विधानसभेत केले स्वागत…

vishwatmaklokswamivarta

दुर्गम भागातील वीज वितरण योजनांना गती द्या – जिल्हाधिकारी

vishwatmaklokswamivarta

नवीन फौजदारी कायद्यांच्या प्रभावी अंमलबजावणीतून दोषसिद्धी वाढवावी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस- पोलीस दलाच्या बैठकीत घेतला कायदा व सुव्यवस्थेचा आढावा – बेपत्ता महिलासंदर्भात गुन्हे निर्गतीपर्यंत पाठपुरावा करावा- मालमत्ताविषयक गुन्ह्यात हस्तगत माल परत देण्याचे प्रमाण वाढवावे- संभाव्य महापुराच्या पार्श्वभूमिवर यंत्रणांनी सतर्क राहण्याच्या सूचना

राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी प्रशासन सज्ज-मतदान कर्मचाऱ्यांना थेट केंद्रावरच मिळणार ईव्हीएम व साहित्य,३ लाख ३३ हजार ५४५ मतदार बजावणार हक्क ; सर्व मतदान केंद्रांवर ‘वेबकास्टिंग’ची नजर, कडेकोट बंदोबस्त

रोजगार हमी योजनेंतर्गत विविध कामे प्रभावीपणे करून जतचा विकास साधावा-खारभूमी विकास मंत्री भरत गोगावले

vishwatmaklokswamivarta