vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

भारतीय जनता पार्टी जालना महानगर जिल्ह्याची अत्यंत महत्वाची बैठक-जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे

भारतीय जनता पार्टी जालना महानगर जिल्ह्याची अत्यंत महत्वाची बैठक-जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे

जालना, प्रतिनिधी भारतीय जनता पार्टी जालना महानगर जिल्ह्याची अतिशय महत्वाची बैठक दि.11 ऑगस्ट 2026 बुधवार रोजी दुपारी 1.00 वा, भाजपा जिल्हा कार्यालय जालना येथे आयोजित करण्यात आली असून, या बैठकीस जालना जिल्हा लोकनेते माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे, माजी मंत्री मा.आ.बबनराव लोणीकर हे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.

यावेळी आ.नारायण कुचे, आ.संतोष पाटील दानवे, माजी आ.कैलास गोरंटयाल, माजी आ.विलासबापू खरात, घनसावंगी विधानसभा प्रमुख सतीश घाटगे, प्रदेश चिटणीस राहुल लोणीकर, महापौर वंदना मगरे, उपमहापौर राजेश राऊत, स्थायी समिती सभापती अशोक पांगारकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

या बैठकीमध्ये दि.14 ऑगस्ट 2026 रोजी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.ना.श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या शुभहस्ते तसेच भाजपा प्रदेशाध्यक्ष आ.रवींद्रजी चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पार्टी जालना जिल्ह्याच्या नवीन जिल्हा कार्यालयाच्या इमारतीच्या भूमिपूजन समारंभ होणार असून त्या नंतर त्या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री मा.ना.श्री. देवेंद्रजी फडणवीस यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी केलेली ऐतिहासिक पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्ज माफी योजना जाहीर करून निर्णय घेतल्याबद्दल त्यांचा जालना जिल्ह्याच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात येणार आहे.सदरील बैठकीस जालना महानगर जिल्ह्यातील सर्व जिल्हा पदाधिकारी, सदस्य, सर्व आघाडी पदाधिकारी सदस्य तसेच शहरातील सर्व नगरसेवक, माजी नगरसेवक, माजी पदाधिकारी, सरपंच, चेअरमन इत्यादीसह कार्यकर्ता बंधू भगिनी यांनी बैठकीस आवर्जून उपस्थित राहावे असे आवाहन भाजपा जालना महानगर जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे यांनी केले आहे.

 

 

संबंधित पोस्ट

वेबसाईट बंद असल्याने नवीन, जुने रेशनकार्ड मिळत नसल्याने-काँग्रेस माथाडी कामगार चे मराठवाडा सरचिटणीस सय्यद अशफाक अली यांनी उपजिल्हाधिकारी संगीता राठोड यांना एका निवादानाद्वारे सुरू करण्याची मागणी केली आहे.

भालीवडी कन्या आश्रमशाळेत जनजाती गौरव दिवस उत्साहात साजरा

vishwatmaklokswamivarta

आंदोलनकर्त्या युवक-युवतींशी दोन दिवस सकारात्मक चर्चा– आदिवासी मंत्री डॉ. अशोक उईके,वसतिगृह प्रवेशाबाबत आदिवासी विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय…

मोशी कचरा डेपो दुर्घटना : आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी इमारतीत अडकलेल्या नागरिकांच्या नातेवाईकांशी साधला संवाद..

आसाम, केरळम आणि केंद्रशासित प्रदेश पुदुच्चेरीमध्ये विधानसभा निवडणुकांसाठी मतदानाला सुरुवात तर मतमोजणी ४ मे रोजी होणार आहे.

vishwatmaklokswamivarta

16 जूनला महानगरपालिकेच्या सर्व 80 शाळांमध्ये शाळा प्रवेशोत्सव…