vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्याकडून चंद्रभागा घाट व श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसराची पाहणी श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे मुख्य सचिव यांनी सपत्नीक दर्शन घेतले

मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्याकडून चंद्रभागा घाट व श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसराची पाहणीश्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे मुख्य सचिव यांनी सपत्नीक दर्शन घेतले

पंढरपूर, प्रतिनिधी राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी आज पंढरपूर दौऱ्यादरम्यान चंद्रभागा नदी घाट तसेच श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसराची पाहणी केली. यावेळी प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी त्यांचे स्वागत केले.चंद्रभागा घाट परिसराची पाहणी

मुख्य सचिव श्री. अग्रवाल यांनी प्रथम चंद्रभागा घाट परिसराची पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी नदीपात्र स्वच्छता, भाविकांसाठी स्नान सुविधा, प्रकाश व्यवस्था तसेच घाटावरील सुरू असलेल्या विविध विकासकामांची माहिती दिली. आषाढी-कार्तिकी वारीतील भाविकांची गर्दी लक्षात घेऊन पायाभूत सुविधांमध्ये वाढ करण्याच्या उपाययोजनाबाबत सूचना दिल्या. तसेच यावर्षीच्या आषाढी वारीमध्ये स्वच्छतेला सर्वोच्च प्राधान्य देऊन भाविक, वारकऱ्यांना प्रशासनाच्या वतीने कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही अशा पद्धतीने सुविधा उपलब्ध करून दिल्याचे त्यांनी सांगितले.

श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसर व प्रस्तावित कॉरिडॉर

त्यानंतर श्री. अग्रवाल यांनी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसराची पाहणी केली. यावेळी तीर्थक्षेत्र विकास आराखडा अंतर्गत 73 कोटीच्या निधीतून झालेल्या मंदिर विकास, सुशोभिकरण कामांची पाहणी ही त्यांनी केली. जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी प्रस्तावित श्री क्षेत्र पंढरपूर कॉरिडॉर प्रकल्पाबाबत माहिती दिली. यामध्ये मंदिर परिसरातील भाविकांसाठी सुलभ दर्शन मार्ग, प्रशस्त प्रदक्षिणा मार्ग व अत्याधुनिक सुविधा तसेच भक्त निवास, बहुमजली पार्किंग, प्रसादालय, माहिती केंद्र, वैद्यकीय मदत कक्ष, वृद्ध व दिव्यांगांसाठी विशेष मार्ग. सुरक्षा व नियोजन: गर्दी व्यवस्थापनासाठी स्वतंत्र प्रवेश-निर्गम मार्ग, सीसीटीव्ही व अग्निशमन यंत्रणा. आदी विषयी सविस्तर माहिती देण्यात आली. तसेच आषाढी यात्रा कालावधीत पालखी मार्ग व पंढरपूर शहर व परिसरात गर्दी नियंत्रणासाठी व वाहतूक नियमासाठी पोलीस प्रशासनाकडून वापरण्यात आलेल्या ए.आय तंत्रज्ञानाबाबतची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी दिली.

प्रस्तावित विकासकामे, भाविकांच्या सुविधा आणि परिसराच्या एकात्मिक नियोजनाबाबत यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली. मुख्य सचिवांनी प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी आवश्यक निधी व समन्वयाबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.

संबंधित पोस्ट

केरोसीनचे टँकर प्राप्त झाले आहे. गोदाम व्यवस्थापकाच्या उपस्थितीत 12 हजार लिटर केरोसीन 124 परवानाधारकास वितरित

सायन येथील “गुरुकृपा ” रेस्टॉरंटचा 50 वा वर्धापनदिन साजरा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम इथे 11 व्या आंतरराष्ट्रीय योग दिन सोहळ्याला केले संबोधित

vishwatmaklokswamivarta

विकसित भारत’साठी कॉस्ट ऑडिट प्रणाली अधिक बळकट करण्याचे राज्यपालांचे आवाहन

महाराष्ट्र राज्य जवाहर बालभवनाच्या परिसरात ‘मुक्त विज्ञान उद्यान’ उभारण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  बालभवनच्या नूतनीकृत इमारतीच्या लोकार्पणप्रसंगी केली.

एमपीएससीची संयुक्त पूर्व परीक्षा ३१ मे रोजी  जिल्ह्यातील १५ उपकेंद्रांभोवती प्रतिबंधात्मक आदेश..