धारावीतील खराब रस्ते व अडथळा युक्त फुटपाथ सुधारावेत धारावी नागरिक समितीची मागणी
मुंबई प्रतिनिधी- धारावीतील खराब रस्ते अडथळा ठरत असलेले फुटपाथ याविषयी गेल्या आठवड्यात सहाय्यक आयुक्त ग उत्तर येई मेंटेनन्स विभाग तसेच स्थानिक आमदार ज्योती गायकवाड यांना धारावी यांच्याकडे व्हाट्सअप द्वारे तक्रारी करून देखील याची दखल घेतली जात नाही यामुळे धारावीचा मध्ये प्रशासन आणि आमदाराविषयी संभ्रम निर्माण होत आहे अशी चर्चा सध्या धारावीत सुरू आहे
15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिना दिवशी याच खड्ड्यातून व अडथळा ठरणाऱ्या फुटपाथ जवळून तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे या नादुरुस्त व खराब रस्ते व फुटपातला लागून नागरिकांनी जायचे का असा सवाल श्री दिलीप गाडेकर संघटक सचिव धारावी नागरिक समिती व प्रमुख ज्येष्ठ नागरिक संघ यांनी मनपा प्रशासनाला केला आहे धारावी कुंभारवाडा रोड संत रोहिदास व संत कक्कया मार्गावर खड्डेच खड्डे निर्माण झाले आहेत तसेच धारावीटी जंक्शन कलानगर खाडी दोन्ही बाजूच्या फुटपाथ वर बेकायदेशीर पार्किंग बेकायदेशीर नर्सरी तसेच दोन्ही फुटपाथ अस्वच्छ अडथळे युक्त संरक्षण भिंत नसलेले अशा अवस्थेत असल्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे या संदर्भात स्थानिक आमदार आणि मनपा जी उत्तर सहाय्यक आयुक्त आणि येई मेंटेनन्स विभाग यांना व्हाट्सअप द्वारे तक्रारी देऊन सुद्धा दुर्लक्ष होत आहे की जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे यामुळे पालिकेची उदासीता दिसून येते किमान स्वातंत्र्य दिना दिवशी तरी चांगले स्वच्छ रस्ते व नागरिकांना चांगले सुविधा युक्त फुटपाथ मिळावे ही अपेक्षा, कारण न्यायालयाने नागरिकास प्रथम फुटपाथ अधिकार व चांगले रस्ते या संदर्भात निर्देश दिले आहेत तसेच मनपा आयुक्त यांनीही संबंधित अधिकाऱ्यांना खातेप्रमुखांना आदेश देऊन देखील त्याचे पालन होत नाही त्याचे नागरिकांना आश्चर्य वाटते दिलीप गाडेकर संघटक सचिव धारावी नागरिक समिती व प्रमुख हॅपीनेस ज्येष्ठ नागरिक संघ धारावी टी जंक्शन ते कलानगर खाडी अडथळे ठरणारे फुटपाथ,धारावी कुंभारवाडा व इतर ठिकाणचे खराब रस्ते