vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

खतांची आगाऊ बुकिंग आता एफएफएस प्रणालीद्वारे

खतांची आगाऊ बुकिंग आता एफएफएस प्रणालीद्वारे

लातूर, प्रतिनिधी : शेतकऱ्यांना अनुदानित रासायनिक खते वेळेत व आवश्यक प्रमाणात उपलब्ध व्हावीत, यासाठी लातूर जिल्ह्यात पुढील काही दिवसांत फ्रेमवर्क फॉर फर्टीलायझर सेल (FFS) ई-प्रणाली लागू करण्यात येणार आहे. या प्रणालीद्वारे शेतकऱ्यांना खतांची आगाऊ बुकिंग करता येणार असून, त्यामुळे रांगा व गर्दी टाळून उपलब्धतेनुसार खताची खरेदी करता येईल, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दिलीप जाधव यांनी दिली.

सध्या रासायनिक खतांची विक्री कृषी सेवा केंद्रांमार्फत ई-पॉस मशीनद्वारे केली जाते. नव्या FFS प्रणालीमुळे खत बुकिंगची प्रक्रिया अधिक सुलभ आणि पारदर्शक होणार आहे. सर्व शेतकऱ्यांनी या प्रणालीचा वापर करावा, असे आवाहनही श्री. जाधव यांनी केले आहे.

अशी असेल प्रक्रियाप्रथम महाराष्ट्र राज्याची निवड करून आधारद्वारे पडताळणी करावी. आधार ओटीपी आणि ई-केवायसीद्वारे ओळख निश्चित करावी. यासाठी शेतकरी ओळखपत्र (Farmer ID) किंवा सातबारा आवश्यक असेल.

यानंतर पिकाची आणि आवश्यक खताची निवड करावी. युरिया, डीएपी, एमओपी, एनपीकेएस, एसएसपी आदी उपलब्ध खतांमधून निवड करता येईल.त्यानंतर आपल्या परिसरातील उपलब्ध साठा असलेल्या विक्रेत्याची निवड करावी. बुकिंग पूर्ण झाल्यानंतर क्यूआर कोड किंवा टोकन क्रमांक मिळेल. हा क्यूआर कोड किंवा टोकन दाखवून तीन दिवसांच्या आत संबंधित विक्रेत्याकडून खताची खरेदी करावी.

आगाऊ बुकिंगमुळे वेळेची बचत होणार असून, गर्दी आणि लांब रांगा टाळता येतील. तसेच जवळच्या विक्रेत्याकडे खताची उपलब्धता निश्चित होऊन योग्य वेळी खत मिळण्यास मदत होणार आहे.

FFS ॲप कुठे मिळेल?‘Framework for Fertilizer Sale’ हे कृषी मंत्रालयाचे ॲप गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे.https://play.google.com/store/apps/details?id=com.agristack.fsasही सुविधा वैयक्तिक शेतकरी तसेच कौटुंबिक शेतकरी किंवा त्यांच्या प्रतिनिधीसाठी उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी गावातील सहाय्यक कृषी अधिकारी किंवा तालुकास्तरीय कृषी अधिकारी (गुण नियंत्रण) यांच्याशी संपर्क साधावा, असेही जाधव म्हणाले.

संबंधित पोस्ट

अलिबाग जिल्हा न्यायालयातील लोकअभिरक्षक सेवेचा जनसामान्यांना आधार-आर्थिक परिस्थिती नसणाऱ्या अशीलांना मोफत कायदेशीर मदत, विधी सेवा प्राधिकरणाचा उपक्रम.

vishwatmaklokswamivarta

दुबईत युद्धजन्य तणाव; हजारो भारतीय अडचणीत – केंद्र सरकारने तात्काळ मदत करावी : खासदार डॉ. कल्याण काळे

श्रीयश आयुर्वेदिक कॉलेज ॲण्ड हॉस्पिटल रिसर्च सेंटर नूतन वास्तू उद्घाटनयेणारा काळ आयुर्वेदाचा सुवर्णकाळ- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

vishwatmaklokswamivarta

विकसित कृषि संकल्प अभियान अंतर्गत शास्त्रज्ञांच्या माध्यमातून शेती तंत्रज्ञान समजून घेण्याचे आवाहन – केंद्रीय राज्यमंत्री ना. प्रतापराव जाधव

vishwatmaklokswamivarta

कोळसा वाहतुकीमुळे पिकांची होणारी नुकसानभरपाई ठरवण्यासाठी समिती गठीत-मंत्री शंभूराज देसाई

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंती निमित्त ‘राष्ट्रीय एकता दिवस’ आणि ‘भारत पर्व २०२५’ राष्ट्रीय एकात्मता वाढवून विविधतेत एकतेचे दर्शन घडविणारा सोहळा

vishwatmaklokswamivarta