vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

प्रदूषण नियमावलीचे उल्लंघन करणा-या सेक्टर 19 तुर्भे येथील बांधकाम साईटवर सीलबंद कारवाई…

प्रदूषण नियमावलीचे उल्लंघन करणा-या सेक्टर 19 तुर्भे येथील बांधकाम साईटवर सीलबंद कारवाई…

नवी मुंबई प्रतिनिधी –

प्रदूषण नियमावलीचे उल्लंघन करणा-या सेक्टर 19 तुर्भे येथील बांधकाम साईटवर सीलबंद कारवाई…

          मा. उच्च न्यायालय, मुंबई यांनी स्वत:हून दाखल करुन घेतलेली (Suo Moto) जनहित याचिका क्र. 3/2023 मध्ये दि. 24 डिसेंबर 2025 रोजी दिलेल्या आदेशानुसार शहरातील वाढत्या वायू प्रदूषणावर तात्काळ व प्रभावी उपाययोजना करण्याचे निर्देश दिलेले आहेत. त्या अनुषंगाने नमुंमपा कार्यक्षेत्रामध्ये बांधकामाच्या ठिकाणी सुरू असलेल्या कामांमुळे होणा-या ध्वनी प्रदूषण, वायू प्रदूषण तसेच ब्लास्टींग करीता अवलंबावयाची मानक कार्यप्रणाली (SOP) जाहीर केलेली होती व तिचे काटेकोर पालन करणेविषयी सर्व बांधकाम धारकांना अवगत केले होते.

          तथापि या नियमांचे उल्लंघन करणा-या बांधकाम व्यावसायिकांना नोटीसा बजावण्यात आलेल्या होत्या. आणि तरीही सुधारणा न आढलेल्या बांधकाम व्यावसायिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आलेली होती.

          अशाचप्रकारे महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या पाहणी दौ-यामध्ये सेक्टर 19, तुर्भे येथे भूखंड क्र. 11 येथील मे. शेलटॉन इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लि. यांनी मानक कार्यप्रणालीतील अनेक नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळल्याने त्यांस तातडीने उपाययोजना करण्याची नोटीस बजावण्यात आलेली होती.

            तथापि त्यांच्या साईटवर आवश्यक सुधारणा न आढळल्याने आज तुर्भे विभाग कार्यालयामार्फत सदर साईट सीलबंद करण्यात आलेली आहे. पर्यावरण विभागाच्या माध्यमातून तुर्भे विभागाचे सहा. आयुक्त तथा विभाग अधिकारी श्री.सागर मोरे आणि त्यांच्या नियंत्रणातील अधिकारी – कर्मचारी तसेच कनिष्ठ अभियंता श्री.विनोद आंब्रे यांनी ही कारवाई केली. या मोहीमेमध्ये अतिक्रमण निर्मूलन पथकातील पोलीस अधिकारी / अंमलदार आणि अतिक्रमण विभागातील सुरक्षारक्षक तैनात होते.

00000

संबंधित पोस्ट

मुंबई विद्यापीठाच्या कालिना कॅम्पस मध्ये बौद्ध भंते विमान्सा यांना झालेल्या मारहाणीचा तीव्र* *निषेध ~ राज्यमंत्री रामदास आठवले* 

vishwatmaklokswamivarta

माजी आमदार अँड त्र्यंबकनाना भिसे यांचा मुख्यमंत्री मा देवेंद्रजी फडणवीस यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीत प्रवेश

vishwatmaklokswamivarta

डच परराष्ट्र मंत्री डेव्हिड वील आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट महाराष्ट्राच्या व्यापार, आर्थिक, पायाभूत सुविधा आणि विकास क्षेत्रात सहभागी होण्याची संधी

vishwatmaklokswamivarta

अत्याचारासाठी जागा उपलब्ध करून देणाऱ्या लॉज/ हॉटेल चालकांवर कायदेशीर कारवाई होणार…. अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे.

म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष यू मिन आंग ह्लाईंग यांचे लोकभवन येथे स्वागत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती

मुंबई उच्च न्यायालय मुख्य न्यायमूर्ती व न्यायमूर्ती मंडळ यांनी व्यक्त केल्या अहमदाबाद विमान दुर्घटनाप्रकरणी संवेदना…

vishwatmaklokswamivarta