vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्य

ठाणे जिल्ह्यातील सर्व आरोग्य संस्था व वैद्यकीय व्यावसायिकांनी ABDM अंतर्गत HFR व HPR नोंदणी करण्याचे आवाहन,डिजिटल आरोग्य व्यवस्थेला बळकटी देण्यासाठी आरोग्य संस्था व वैद्यकीय व्यावसायिकांची राष्ट्रीय स्तरावरील नोंदणी आवश्यक

ठाणे जिल्ह्यातील सर्व आरोग्य संस्था व वैद्यकीय व्यावसायिकांनी ABDM अंतर्गत HFR व HPR नोंदणी करण्याचे आवाहन,डिजिटल आरोग्य व्यवस्थेला बळकटी देण्यासाठी आरोग्य संस्था व वैद्यकीय व्यावसायिकांची राष्ट्रीय स्तरावरील नोंदणी आवश्यक

ठाणे, प्रतिनिधी: आयुष्मान भारत डिजिटल मिशन (ABDM) अंतर्गत ठाणे जिल्ह्यातील सर्व आरोग्य संस्था, रुग्णालये, क्लिनिक, प्रयोगशाळा, डायग्नोस्टिक सेंटर, इमेजिंग सेंटर, दंत चिकित्सालय तसेच विविध मान्यताप्राप्त वैद्यकीय पद्धतीने आरोग्य सेवा देणाऱ्या संस्थांनी Health Facility Registry (HFR) मध्ये नोंदणी करावी. तसेच सर्व वैद्यकीय व्यावसायिक व संबंधित आरोग्य सेवा देणाऱ्या व्यावसायिकांनी Health Professional Registry (HPR) मध्ये नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे.

आयुष्मान भारत डिजिटल मिशन (ABDM) हे भारत सरकारच्या National Health Authority (NHA) मार्फत सुरू करण्यात आलेले डिजिटल आरोग्य क्षेत्रातील महत्त्वपूर्ण अभियान आहे. Unified Health Interface (UHI) या डिजिटल आरोग्य परिसंस्थेच्या माध्यमातून देशातील आरोग्य सेवा अधिक सुसूत्र, विश्वासार्ह आणि तंत्रज्ञानाधारित करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. या डिजिटल आरोग्य परिसंस्थेमध्ये आरोग्य संस्था व वैद्यकीय व्यावसायिकांची अधिकृत नोंदणी करण्यासाठी HFR आणि HPR विकसित करण्यात आले आहेत.

HFR व HPR नोंदणीमुळे डिजिटल आरोग्य व्यवस्थेला चालनाHealth Facility Registry (HFR) मध्ये आरोग्य संस्थांची नोंदणी झाल्यामुळे देशभरातील प्रमाणित आरोग्य संस्थांची डिजिटल स्वरूपात माहिती उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. नागरिकांना विश्वासार्ह आरोग्य सेवा प्रदात्यांची माहिती उपलब्ध होण्याबरोबरच भविष्यात डिजिटल आरोग्य सेवा, इलेक्ट्रॉनिक हेल्थ रेकॉर्ड (EHR), डिजिटल ऑनलाइन रेफरल, टेलिमेडिसिन, डिजिटल विमा दावे (Insurance Claims) तसेच आयुष्मान भारत योजनेशी संबंधित डिजिटल सेवांच्या एकत्रीकरणासाठी याचा उपयोग होणार आहे.

HPR म्हणजे Health Professional Registry यामध्ये वैद्यकीय व्यावसायिकांची अधिकृत नोंदणी केली जाते. त्यामुळे वैद्यकीय व्यावसायिकांची ओळख व व्यावसायिक माहिती डिजिटल स्वरूपात उपलब्ध होण्यास मदत होणार असून, नागरिकांना आरोग्य सेवा देणाऱ्या वैद्यकीय व्यावसायिकांची सत्यता पडताळण्याच्या प्रक्रियेलाही बळकटी मिळणार आहे.ABDM अंतर्गत वैद्यकीय व्यावसायिकांची अधिकृत डिजिटल नोंदणी झाल्यामुळे नागरिकांना वैद्यकीय सेवा देणाऱ्या व्यक्तीची सत्यता पडताळता येणे शक्य होणार असून, बनावट अथवा अनधिकृत वैद्यकीय सेवा देणाऱ्या व्यक्तींवर नियंत्रण ठेवण्यासही मदत होणार आहे.ठाणे जिल्ह्यातील खालील सर्व प्रकारच्या आरोग्य संस्थांनी Health Facility Registry (HFR) मध्ये नोंदणी करणे आवश्यक आहे—

-सर्व शासकीय व बृहन्मुंबई महानगरपालिका रुग्णालये (BNHA)-ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील इतर सर्व खासगी आरोग्य संस्था व रुग्णालये-क्लिनिक-डायग्नोस्टिक सेंटर-प्रयोगशाळा-मेडिकल स्टोअर्स-इमेजिंग सेंटर (एक्स-रे/MRI), USG केंद्रे,दंत चिकित्सालये-आयुर्वेद, होमिओपॅथी व युनानी तसेच इतर मान्यता प्राप्त वैद्यकीय पद्धतीने आरोग्य सेवा देणाऱ्या संस्थाठाणे जिल्ह्यातील शासकीय आरोग्य संस्थांची HFR (Health Facility Registry) तसेच संबंधित रुग्णालयांमध्ये कार्यरत वैद्यकीय अधिकारी आणि नर्सिंग स्टाफ यांची HPR (Health Professional Registry) मध्ये नोंदणी करण्यात आलेली असल्याची माहिती जिल्हा आरोग्य विभागाने दिली आहे.

वैद्यकीय व्यावसायिकांसाठी HPR नोंदणीची कार्यवाहीखासगी वैद्यकीय व्यावसायिकांनी सर्वप्रथम Healthcare Professionals Registry (HPR) मध्ये नोंदणी करून आपले प्रोफाइल तयार करावे. नोंदणी प्रक्रियेदरम्यान आवश्यक माहिती भरून HPR ID तयार करावा.त्यानंतर संबंधित आरोग्य संस्थेची Health Facility Registry (HFR) मध्ये नोंदणी करावी. नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्राप्त होणारा HFR ID आणि HPR ID सुरक्षित जतन करावा. आवश्यकतेनुसार हे ID जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयाकडे उपलब्ध करून द्यावेत.

ज्या आरोग्य संस्थांनी यापूर्वी HFR किंवा HPR मध्ये नोंदणी केली आहे, त्यांनी संबंधित माहिती अद्ययावत (Update) असल्याची खात्री करावी. HFR व HPR ID यशस्वीरित्या तयार झाल्यानंतर आवश्यक माहिती Google Form मध्ये भरावी, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.

ऑनलाइन नोंदणीसाठी संकेतस्थळ उपलब्धHFR व HPR नोंदणीसाठी संबंधितांनी[www.nhpr.abdm.gov.in/nhpr/v4/hfr](http://www.nhpr.abdm.gov.in/nhpr/v4/hfr) या संकेतस्थळावर जाऊन नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी. HFR व HPR नोंदणीसाठी आवश्यक सविस्तर मार्गदर्शक सूचना तसेच QR Code संबंधित संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

नोंदणी प्रक्रियेदरम्यान कोणतीही शंका, अडचण अथवा तांत्रिक सहाय्य आवश्यक असल्यास [abdmthanecircle@gmail.com](mailto:abdmthanecircle@gmail.com) या ई-मेलवर संपर्क साधता येईल. ई-मेल करताना संबंधित संस्थेचे नाव, संपर्क क्रमांक आणि उद्भवलेल्या समस्येचे संक्षिप्त वर्णन नमूद करावे, जेणेकरून आवश्यक मार्गदर्शन तातडीने उपलब्ध करून देता येईल.डिजिटल आरोग्य व्यवस्थेत सर्वांचा सहभाग आवश्यकABDM अंतर्गत HFR आणि HPR नोंदणीमुळे ठाणे जिल्ह्यातील आरोग्य सेवा अधिक संघटित आणि डिजिटल पद्धतीने उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. आरोग्य संस्था आणि वैद्यकीय व्यावसायिकांची अधिकृत डिजिटल ओळख निर्माण झाल्याने भविष्यातील डिजिटल आरोग्य सेवांचा विस्तार सुलभ होणार आहे.

नागरिकांना विश्वासार्ह आरोग्य सेवा प्रदात्यांची माहिती उपलब्ध होणे, डिजिटल आरोग्य सेवा, इलेक्ट्रॉनिक हेल्थ रेकॉर्ड, टेलिमेडिसिन, ऑनलाइन रेफरल तसेच डिजिटल विमा दावे यांसारख्या सेवांना चालना मिळणे, हा या उपक्रमाचा महत्त्वपूर्ण भाग आहे.त्यामुळे ठाणे जिल्ह्यातील सर्व संबंधित आरोग्य संस्था व वैद्यकीय व्यावसायिकांनी HFR व HPR नोंदणीची कार्यवाही तातडीने पूर्ण करून डिजिटल आरोग्य व्यवस्थेला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे यांनी केले आहे.

जिल्हा आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, ठाणेई-मेल : [abdmthanecircle@gmail.com](mailto:abdmthanecircle@gmail.com)HFR/HPR नोंदणी : [www.nhpr.abdm.gov.in/nhpr/v4/hfr](http://www.nhpr.abdm.gov.in/nhpr/v4/hfr)

0000

संबंधित पोस्ट

मुख्य कार्यकारी अधिकारी  यादव यांची वज्रेश्वरी व अनगाव प्राथमिक आरोग्य केंद्रांना भेट-पंचायत समिती भिवंडी येथे आरोग्य सेवा, SLWM Rules-2026 व घरकुल योजनांच्या कामांचा घेतला आढावा

सशक्त बालक हीच देशाची खरी संपत्ती;संपूर्ण समाज निरोगी व सशक्त करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा – पालकमंत्री चंद्रकांत पाटील- पालकमंत्र्यांच्या हस्ते राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा शुभारंभ- सुदृढ बालकांसाठी मुलांच्या आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन

हिंद-दी-चादर’ शहिदी समागम कार्यक्रमानिमित्त 10 ते 25 फेब्रुवारी कालावधीतनवी मुंबई महानगरपालिकेमार्फत विशेष आरोग्य ‍शिबीरांचे आयोजन 

vishwatmaklokswamivarta

महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अलिबाग वैद्यकीय महाविद्यालयात विविध सामाजिक उपक्रम

जिल्ह्यात १४ वर्षीय मुलींसाठी ‘एचपीव्ही’ लसीकरण मोहीम९ मार्चपासून सुरुवात

श्री गुरु तेग बहादूर साहिब जी यांच्या ३५० व्या शहीदी समागम आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद१ हजार १०३ नागरिकांनी घेतला लाभ