vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

भास्कर आबा दानवेंच्या पुढाकाराने भाविकांच्या तीर्थयात्रेसाठी दोन बस उपलब्ध

भास्कर आबा दानवेंच्या पुढाकाराने भाविकांच्या तीर्थयात्रेसाठी दोन बस उपलब्ध

 

जालना (प्रतिनिधी) : श्रावण मासानिमित्त जालना तालुक्यातील भाविक भक्त तीर्थ दर्शन यात्रेसाठी जाणार आहेत, सामाजिक कार्यकर्ते प्रल्हाद ढवळे यांच्या मार्फत यात्रेसाठी जाणाऱ्या भाविकांनी व बस उपलब्ध करून द्याव्यात यासाठी भाजपा जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे यांच्याकडे मागणी केली होती यासाठी भाजपा जालना महानगर जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे यांनी पुढाकार घेतला आहे. या मागणीची तात्काळ दखल घेऊन त्यांनी दोन एसटी बस उपलब्ध करून देण्यात याव्यात यासाठी जालना बसस्थानकाच्या नियंत्रकांशी संवाद साधून सूचना केली.

श्रावण मासाच्या पावन पर्वानिमित्त पंढरपूर, तुळजापूर, परळी वैजनाथ आणि औंढा नागनाथ या प्रमुख तीर्थक्षेत्रांच्या दर्शनासाठी यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. आस्था, श्रद्धा आणि समाधान यांची पवित्र यात्रा” या भावनेतून आयोजित या यात्रेत मोठ्या संख्येने भाविक सहभागी होणार आहेत. या यात्रेचा पहिल्या दिवशी जालना (सोलगव्हाण) येथून प्रस्थान करून पंढरपूर व तुळजापूर दर्शन, तर दुसऱ्या दिवशी परळी वैजनाथ व औंढा नागनाथ दर्शन घेऊन जालना येथे परतण्याचा कार्यक्रम आहे.

यात्रेत सहभागी होणाऱ्या भाविकांची कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी भास्कर आबा दानवे यांनी जालना बसस्थानक नियंत्रकांशी संपर्क साधून दोन बस उपलब्ध करून देण्यासाठी पाठपुरावा केला. भाविकांचा प्रवास सुखरूप व सुविधाजनक व्हावा, यासाठी आपण सदैव प्रयत्नशील असल्याचे भास्कर आबा दानवे यांनी सांगितले.

 

संबंधित पोस्ट

सातारा जिल्ह्याच्या जडणघडणीत क्रांतिवीर किसन वीर यांचा मोलाचा वाटा – पालकमंत्री शंभूराज देसाई

vishwatmaklokswamivarta

भाजपा जिल्हा कार्यालयात माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री व लोकनेते रावसाहेब पाटील दानवे दादा यांच्या शुभहस्ते श्री गणेशाची आरती मंगलमय वातावरणात संपन्न

vishwatmaklokswamivarta

ज्येष्ठ नागरिकांना मुंबईत छत्री वाटप

१०० दिवस झाले, आता १५० दिवसांचा दुसरा कार्यक्रम – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची चौंडीत घोषणा विकसित महाराष्ट्र, ई-गव्हर्नन्स आणि सेवा विषयक प्रशासकीय सुधारणांवर भर, तपशील आज देणार

पत्रकार परिषदेतून माध्यम प्रतिनिधींशी निवडणूक विषयक सुसंवाद – सहकार्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

पुण्यातील जमीन खरेदी-विक्री व्यवहारामध्ये मुद्रांक शुल्क चुकविल्याप्रकरणी चौकशीसाठी समिती

vishwatmaklokswamivarta