vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

तासगाव रथोत्सवानिमित्त 15 सप्टेंबर रोजी वाहतुकीत बदल…

तासगाव रथोत्सवानिमित्त 15 सप्टेंबर रोजी वाहतुकीत बदल…

        सांगली, प्रतिनिधी : तासगाव संस्थान, सांगली येथील दीड दिवसाचे गणपती विसर्जन व रथोत्सव दि. 15 सप्टेंबर 2026 रोजी तासगाव शहरात साजरा करण्यात येणार आहे. रथोत्सव पाहण्यासाठी जिल्ह्यातील तसेच परजिल्ह्यातील मोठ्या संख्येने नागरिक, महिला व लहान मुले तासगाव शहरात येत असतात. या पार्श्वभूमीवर नागरिकांची सुरक्षितता तसेच गर्दीत कोणतेही वाहन घुसून जीवितास धोका निर्माण होऊ नये, यासाठी पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम, 1951 च्या कलम 34 अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारान्वये दि. 15 सप्टेंबर 2026 रोजी 00.01 वाजल्यापासून 24.00 वाजेपर्यंत काही मार्गांवरील वाहतूक तात्पुरत्या स्वरूपात पर्यायी मार्गाने वळविण्याचे आदेश जारी केले आहेत.

       पोलीस वाहने, रुग्णवाहिका व अग्निशमन दलाची वाहने वगळता इतर सर्व वाहनांसाठी पुढीलप्रमाणे पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आले आहेत.१) सांगली-मणेराजुरीकडून येणारी वाहतूक (विटा/आटपाडीकडे जाणारी वाहने) :-कॉलेज कॉर्नर तासगाव – भिलवडी नाका – एसटी स्टॅण्ड – विटा नाका – विटा.कॉलेज कॉनर्र तासगाव – भिलवडी नाका – एस.टी. स्टॅण्ड – विटा नाका – आटपाडी.

२) विट्याकडून तासगावकडे येणारी वाहतूक (सांगलीकडे जाणाऱ्या वाहनांसाठी) :-विटा नाका – चिंचणी नाका – चिंचणी चौक – थळेश्वर मंदिर चिंचणी – मणेराजुरी हायवे – कॉलेज कॉर्नर, तासगाव – सांगली.३) आटपाडीकडून तासगावकडे येणारी वाहतूक (सांगलीकडे जाणाऱ्या वाहनांसाठी) :-आटपाडी – पुणदी फाटा – वाघमोडे वस्ती चिंचणी – चिंचणी चौक – थळेश्वर मंदिर चिंचणी – मणेराजुरी हायवे – कॉलेज कॉर्नर, तासगाव – सांगली.

४) आटपाडीकडून तासगावकडे येणारी वाहतूक (भिलवडीकडे जाणाऱ्या वाहनांसाठी) :आटपाडी – पुणदी फाटा – वाघमोडे वस्ती चिंचणी – चिंचणी चौक – थळेश्वर मंदिर चिंचणी – मणेराजुरी हायवे – कॉलेज कॉर्नर, तासगाव – भिलवडी.        या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायदा १९५१ प्रमाणे कारवाई करण्यात येईल, असे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी स्पष्ट केले आहे.

संबंधित पोस्ट

महापारेषणला पॉवर ट्रान्समिशन पुरस्कार प्रदान अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजीव कुमार यांच्याकडून अभिनंदन

vishwatmaklokswamivarta

न्याय द्या, नाहीतर प्राण देईन! जयश्री कटके यांचे आमरण उपोषण तीव्र १२ दिवसांपासून अन्नत्याग; खंडणी, तोडफोड व जीवघेण्या धमक्यांचा आरोप – प्रशासन मात्र शांत

छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिरा’चा उत्साहात शुभारंभ;शासकीय योजनांचा लाभ एकाच छताखाली – आमदार संजय गायकवाड

सातारा जिल्ह्याला पर्यटन हब करणार – पालकमंत्री शंभूराज देसाई महाराष्ट्र राज्य स्‍थापना दिनानिमित्त ध्वजवंदन

महाविस्तार अपचा जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी लाभ घ्यावा

vishwatmaklokswamivarta

वर्धा शहरालगत असलेल्या रोठा परिसरात एका बारा वर्षाच्या बालिकेची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली. या बालिकेवर लैंगिक अत्याचार करून हत्या केल्याचा संशय तीन आरोपी अटक .