vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

मतदार यादीवरील दावे-हरकतींसाठी ३० सप्टेंबरपर्यंत मुदत;एसआयआर अंतर्गत नमुना ६, ७ व ८ द्वारे अर्ज करण्याची संधी

मतदार यादीवरील दावे-हरकतींसाठी ३० सप्टेंबरपर्यंत मुदत;एसआयआर अंतर्गत नमुना ६, ७ व ८ द्वारे अर्ज करण्याची संधी

 

बुलढाणा, प्रतिनिधी : विशेष सखोल पुनरिक्षण (SIR-2026) अंतर्गत राज्यातील सर्व २८८ विधानसभा मतदारसंघांच्या प्रारूप मतदार याद्या ३१ ऑगस्ट २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. या याद्यांच्या अनुषंगाने दावे व हरकती दाखल करण्यासाठी ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत मुदत देण्यात आली आहे.

नवमतदार तसेच मतदार यादीत नाव समाविष्ट न झालेल्या पात्र नागरिकांना त्यांच्या सध्याच्या रहिवासाच्या ठिकाणाहून नमुना-६ व घोषणापत्राद्वारे नाव समाविष्ट करण्याची संधी आहे. मतदार यादीतील नाव वगळण्यासाठी नमुना-७, तर नावातील दुरुस्ती, मतदार ओळखपत्र बदलणे किंवा दिव्यांग चिन्हांकनासाठी नमुना-८ द्वारे अर्ज करता येणार आहे. मतदारसंघांतर्गत किंवा मतदारसंघाबाहेर स्थलांतर झाल्यामुळे पत्ता बदलण्यासाठीही नमुना-८ उपलब्ध आहे.  दावे-हरकती दाखल केल्यानंतर संबंधित मतदार नोंदणी अधिकाऱ्यांकडून त्याबाबत सूचना फलकावर प्रसिद्धी करण्यात येते. त्यानंतर सात दिवसांच्या कालावधीनंतर संबंधित प्रकरणांवर निर्णय घेतला जातो. SIR-2026 मधील दावे व हरकतींच्या नमुना-६, ७ व ८ नुसार अर्जांच्या याद्या मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र यांच्या संकेतस्थळावरील “Claims and Objections during SIR-2026” या शीर्षकाखाली उपलब्ध करून देण्यात येत आहेत.

दरम्यान, मतदार यादीच्या पुनरिक्षणासंदर्भात चुकीचे विधान किंवा खोटी घोषणा करणाऱ्या व्यक्तीस लोकप्रतिनिधित्व अधिनियम, १९५० मधील कलम ३१ नुसार एक वर्षापर्यंत कारावास, दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकते, असे प्रसिद्धीपत्रकाव्दारे कळविण्यात आले आहे.

0000

संबंधित पोस्ट

पूर्व विदर्भातील पशुपालन संधी आणि कार्यक्रम’ यावर विचारमंथन

मुंबईतील पावसाळापूर्व तयारीचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा मुंबईत ‘शून्य जिवीतहानी’ उद्दिष्ट ठेवून यंत्रणांनी समन्वयातून काम करावे: उपमुख्यमंत्री यांचे निर्देश

विशेष परिसंवाद : सीजेपी आंदोलनात अर्बन नक्षलवाद!न्यायव्यवस्था, सैन्य आणि शिक्षण व्यवस्थेवरील डाव्यांचे आक्रमण उधळून लावा! – अधिवक्ता सत्येंद्र मुळे, मुंबई उच्च न्यायालय

केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते पाच वर्षाखालील बालकांना पाजण्यात आला पोलिओचा डोस

विशाखापट्टणम इथं #BRICS युवा मंत्र्यांची बैठक पार पडली. या बैठकीत ब्रिक्स युवा मंत्र्यांचे संयुक्त निवेदन स्वीकारण्यात आले. बैठकीत ब्रिक्स देशांमधील युवा सहकार्याच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला. तसंच तरुणांसाठी शिक्षण, कौशल्यविकास, उद्योजकता, नवोन्मेष आणि सामाजिक विकास या क्षेत्रांमध्ये अधिक संधी उपलब्ध करून देण्याबाबत चर्चा करण्यात आली.

अवैध वाळू माफियांवर ठाणे जिल्हा प्रशासनाचा धडक सर्जिकल स्ट्राईक…! भिवंडीतील दिवे-केवणी खाडीत १० बार्ज अन् १६ सक्शन पंप जप्त; तब्बल ३.६० कोटींचा मुद्देमाल उद्ध्वस्त!

vishwatmaklokswamivarta