vishwatmaklokswamivarta
Breaking News
तंत्रज्ञानप्रदेश

ग्रामीण उत्पादनांना डिजिटल बाजारपेठेची नवी संधी ग्रामीण उत्पादनांना डिजिटल बाजारपेठेची नवी संधी‘गावाकडचं.कॉम’ महिला बचत गट व शेतकर्‍यांसाठी ठरणार हक्काचे व्यासपीठ

ग्रामीण उत्पादनांना डिजिटल बाजारपेठेची नवी संधी ग्रामीण उत्पादनांना डिजिटल बाजारपेठेची नवी संधी‘गावाकडचं.कॉम’ महिला बचत गट व शेतकर्‍यांसाठी ठरणार हक्काचे व्यासपीठ

जालना, (प्रतिनिधी)-ग्रामीण भागात तयार होणारे पारंपरिक खाद्यपदार्थ, घरगुती उत्पादने, सेंद्रिय वस्तू आणि स्थानिक कौशल्यालामोठी मागणी असतानाही योग्य बाजारपेठ, ब्रँडिंग आणि आधुनिक पॅकेजिंगअभावीअनेक उत्पादकांना अपेक्षित बाजारपेठ मिळत नाही.ही अडचण दूर करण्यासाठी‘गावाकडचं.कॉम’ या डिजिटल व्यासपीठाची सुरुवात करण्यात आली आहे.ग्रामीणउत्पादनांना थेट आधुनिक ग्राहकांपर्यंत पोहोचविण्याचा या उपक्रमाचा

प्रयत्न आहे.

‘गावाकडचं.कॉम’ हे केवळ ऑनलाइन खरेदी-विक्रीचे व्यासपीठ नसून महिला बचतगट, शेतकरी, घरगुती उत्पादक, लघुउद्योजक आणि पारंपरिक पदार्थ तयारकरणार्‍या कारागिरांना डिजिटल बाजारपेठेशी जोडणारे माध्यम म्हणून विकसितकरण्यात आले आहे. गावातील उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देतानाचगुणवत्ता, पॅकेजिंग, ब्रँडिंग, डिजिटल मार्केटिंग आणि ऑनलाइन विक्रीचीप्रक्रिया सुलभ करण्यावर भर देण्यात येत आहे. या माध्यमातून घरगुतीपद्धतीने तयार केलेली लोणची, पापड, चटण्या, विविध प्रकारची तयार पिठे,पारंपरिक महाराष्ट्रीय खाद्यपदार्थ तसेच नैसर्गिक आणि सेंद्रिय

उत्पादनांना ग्राहकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला जात आहे.त्यामुळे ग्रामीण भागातील उत्पादकांना स्थानिक बाजारपेठेच्या पलीकडे जाऊन मोठ्या ग्राहकवर्गापर्यंत पोहोचण्याची संधी मिळणार आहे.ग्रामीण महिलांना व्यवसायाची नवी दिशाग्रामीण भागातील अनेक महिला बचत गट व महिला घरगुती स्तरावर विविधउत्पादने तयार करतात. मात्र, उत्पादनाची विक्री, जाहिरात आणिग्राहकांपर्यंत पोहोचण्याची व्यवस्था नसल्याने त्यांचा व्यवसाय मर्यादित राहतो. ‘गावाकडचं.कॉम’च्या माध्यमातून अशा महिलांना आपल्या उत्पादनांनाडिजिटल ओळख देऊन व्यापक बाजारपेठेत विक्री करण्याची संधी मिळणार आहे. ‘आजच्या काळात ग्राहकांना शुद्ध, नैसर्गिक आणि पारंपरिक उत्पादनांची गरजवाढत आहे. मात्र ग्रामीण उत्पादकांना मोठ्या बाजारपेठेपर्यंत पोहोचण्याचीसुविधा, डिजिटल विक्रीचे ज्ञान आणि ब्रँडिंगचा अभाव आहे. ही दरी दूरकरण्यासाठी ‘गावाकडचं.कॉम’ दुवा म्हणून काम करणार आहे. प्रत्येक गावातीलगुणवत्तापूर्ण उत्पादनाला डिजिटल ओळख मिळावी, हे आमचे ध्येय आहे,’ असेसंस्थापकांनी सांगितले.

रोजगार निर्मितीलाही चालना,यावेळी गावाकडचं कॉमचे गोरक्षनाथ शिंदे यांनी म्हटले आहे की, ग्रामीणउत्पादनांना डिजिटल बाजारपेठ उपलब्ध झाल्याने स्थानिक उत्पादकांच्या,उत्पन्नात वाढ होण्याबरोबरच पॅकेजिंग, लॉजिस्टिक्स, डिजिटल मार्केटिंगआणि वितरण क्षेत्रात रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होण्याची अपेक्षाआहे. ग्रामीण भागातील पारंपरिक कौशल्याला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देतस्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देण्याचा हा उपक्रम असल्याचे सांगण्यातआले. ‘जुनी चव आणि नवीन तंत्रज्ञान यांचा सुंदर संगम’ अशी ओळख निर्माणकरणार्‍या ‘गावाकडचं.कॉम’मुळे गावागावातील गुणवत्तापूर्ण उत्पादनांना

डिजिटल बाजारपेठ मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे, असे गावाकडचं. कॉमसहसंस्थापक गोरक्षनाथ ज.शिंदे यांनी सांगितले. यासाठी संपर्कमो.९१४६६५१५००, सी.टी.एस. क्र. ७४८१, गौरीशंकर, शास्त्री रोड, दत्तमुखीहनुमान मंदिराजवळ, जुना जालना यावर भेट द्या, असेही शिंदे यांनी म्हटले आहे.

००००००००

 

संबंधित पोस्ट

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बजावला मतदानाचा हक्क

vishwatmaklokswamivarta

घराघरात अस्मितेसोबत मराठी ज्ञानभाषा करणे मायमराठीच्या उद्याच्या भविष्यासाठी आवश्यक मराठी भाषा दिनाला मान्यवरांचा सूर; विभागीय माहिती कार्यालयात मराठी भाषा गौरव दिन साजरा

जन धन खातेधारकांसाठी ई-केवायसी’ आणि जनसुरक्षा योजनांचीअंमलबजावणीसाठी बँक आपल्या गावात..

ग्रामीण स्वच्छता सर्वेक्षण २०२५ : ग्रामपंचायतींनी सर्वेक्षणासाठी सज्ज व्हावे – मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले 

राज्यस्तरीय मिनी सरस २०२५आर्थिक सक्षमीकरणामुळे महिलांची प्रगती- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी 

vishwatmaklokswamivarta

आंतरजातीय विवाह केलेल्या १४० जोडप्यांना अनुदान वितरीत