vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

२७ सप्टेंबर रोजी बुवाबाजीविरोधात डोंबिवलीत संघर्ष परिषद

२७ सप्टेंबर रोजी बुवाबाजीविरोधात डोंबिवलीत संघर्ष परिषद

ठाणे, प्रतिनिधी : फलज्योतिष, बुवाबाजी आणि चमत्कारांच्या नावाखाली होणारे शोषण, तसेच अंधश्रद्धेच्या माध्यमातून होणारी आर्थिक, मानसिक, लैंगिक आणि सामाजिक फसवणूक याविरोधात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, ठाणे जिल्ह्याच्या वतीने रविवार, दि. २७ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी ३ वाजता डोंबिवली पश्चिम रेल्वे स्थानकाजवळील जोंधळे विद्यासमूहाच्या सभागृहात ‘संघर्ष परिषद’ आयोजित करण्यात आली आहे.

या परिषदेचे उद्घाटन पुरोगामी विचारांचे लेखक साथी अभिजीत देशपांडे यांच्या हस्ते होणार आहे.परिषदेत ‘फलज्योतिष : एक थोतांड’ या विषयावर अंधश्रद्धा निर्मूलन पत्रिकेचे कार्यकारी संपादक उत्तम जोगदंड मार्गदर्शन करणार आहेत. तसेच ‘बुवाबाजीचे वाढते प्रकार’ या विषयावर बुवाबाजी संघर्ष विभागाच्या मेंटॉर साथी ॲड. रंजना पगार-गवांदे विचार मांडणार आहेत.

‘चमत्कारांचे प्रात्यक्षिक आणि त्याचा खुलासा’ या सत्रात महा-अंनिसचे राज्य कार्यवाह तथा प्रकाशन विभागाचे प्रमुख प्राचार्य मच्छिंद्रनाथ मुंडे चमत्कारांमागील दावे आणि त्यामागील वास्तव प्रात्यक्षिकांसह स्पष्ट करणार आहेत.अंधश्रद्धेच्या नावाखाली नागरिकांचे शोषण होऊ नये, तसेच संकटाच्या काळात भोंदूंच्या भूलथापांना बळी न पडता विज्ञान, वैद्यकीय उपचार आणि संविधानिक मूल्यांचा आधार घ्यावा, हा या परिषदेचा प्रमुख उद्देश आहे.

या संघर्ष परिषदेला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन अंनिसचे प्रधान सचिव राजेश देवरुखकर यांनी केले आहे.

संबंधित पोस्ट

म्हाडाच्या प्रकल्पांचा व प्रस्तावित नियमावलींचा-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आढावा

पालघर जिल्ह्यासाठी स्वतंत्र जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक स्थापन करण्यास गती —मंत्री बाबासाहेब पाटील

हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादुर यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त नांदेड मधील भव्य कार्यक्रम यशस्वी करण्याचे निर्देश – मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव डॉ. श्रीकर परदेशीकार्यक्रमासाठी सुरक्षा यंत्रणा सज्ज ठेवण्याच्या सूचना – सचिव रुचेश जयवंशी

नागरिकांच्या ‘इज ऑफ लिव्हिंग’ साठीशहरी परिवहन सेवेत आमूलाग्र बदल करावेत- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस§ शहरांमधील परिवहन सेवेच्या विकासासाठी स्वतंत्र एकात्मिक महानगर वाहतूक प्राधिकरण§ प्राधिकरण स्थापन करण्याचा कायदा करण्यापूर्वी हरकती, सूचना मागवा…

पुराचा वेढा भेदून ‘आपदा मित्र’ ठरले देवदूत; सिरोंचात सर्पदंश झालेल्या व्यक्तीला जीवदान

vishwatmaklokswamivarta

अग्निशमन दलाचे बळकटीकरण करावे विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांचे निर्देश नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा २०२७

vishwatmaklokswamivarta