vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

लोकसंवाद-२०२६’-अमली पदार्थविरोधी जनजागृतीसाठी गणेश मंडळांचा पुढाकार मिरजेत महात्मा गांधी पोलीस चौकीत नशामुक्ती पोस्टर्स प्रदर्शन

‘लोकसंवाद-२०२६’-अमली पदार्थविरोधी जनजागृतीसाठी गणेश मंडळांचा पुढाकार मिरजेत महात्मा गांधी पोलीस चौकीत नशामुक्ती पोस्टर्स प्रदर्शन

 

 सांगली, प्रतिनिधी : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या जिल्हा माहिती कार्यालय, सांगली व जिल्हा पोलीस दलाच्या वतीने आयोजित ‘लोकसंवाद-२०२६’ उपक्रमांतर्गत महात्मा गांधी पोलीस चौकी परिसरातील ‘महात्मा गांधीचा राजा’ गणेश मंडळ येथे नशामुक्ती व अमली पदार्थविरोधी अभियानाबाबत नागरिकांचे प्रबोधन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पोलीस अधीक्षक तुषार दोशी होते.

यावेळी नशामुक्ती विषयावर आयोजित चित्रकला स्पर्धेतील सहभागी कलाकृतींचे प्रदर्शन उभारण्यात आले होते. यावेळी अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, मिरज उपविभागीय पोलीस अधिकारी अजय कोकाटे, पोलीस निरीक्षक किरण चौगुले, जिल्हा माहिती अधिकारी संप्रदा बीडकर यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी, पोलीस विभागाचे अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी पोलीस अधीक्षक तुषार दोशी म्हणाले, अमली पदार्थांचे सेवन हे केवळ व्यक्तीच्या आरोग्यावर परिणाम करणारे नसून, त्याचे कुटुंब व समाजावरही दूरगामी परिणाम होतात. त्यामुळे अमली पदार्थांच्या सेवनापासून युवकांना दूर ठेवण्यासाठी कुटुंब, समाज, गणेश मंडळे आणि प्रशासन यांनी एकत्रितपणे जनजागृती करणे आवश्यक आहे. यावर्षी नशामुक्ती रॅली, चित्रकला स्पर्धा आणि त्यानंतर आता काही गणेश मंडळांनी नशामुक्तीसंदर्भात देखावे सादर करून जनजागृती करण्याचा प्रयत्न केला आहे. अमली पदार्थांचे दुष्परिणाम, नशामुक्ती आणि युवकांनी व्यसनांपासून दूर राहण्याबाबत प्रभावी संदेश या माध्यमातून देण्यात आला असून, अशा मंडळांचे त्यांनी अभिनंदन केले.

यावेळी चित्रकला स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांचा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

00000

संबंधित पोस्ट

कनेक्टिंग लिंकच्या एंट्री पॉईंटजवळ दरड कोसळलेल्या घटनेची सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केली प्रत्यक्ष पाहणी

जयऱ्या आत्मचरित्र पुस्तकाचे नामदार श्री सुशील कुमारजी शिंदे यांच्या हस्ते प्रकाशन..

vishwatmaklokswamivarta

जिल्हा पीसीपीएनडीटी सल्लागार समितीची बैठक गर्भपात-सोनोग्राफी केंद्र,गर्भपात गोळ्यांच्या विक्रीची तपासणी करा- जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांचे निर्देश

योजना सामाजिक न्यायाच्या’ जिल्हा माहिती कार्यालयाच्या पुस्तिकेचे विमोचन

सातारा जिल्ह्यात पुढील काही दिवसांमध्ये विजेच्या गडगडाटसह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन*

स्वाधार योजनेअंतर्गत अर्ज करण्यास 15 जानेवारीपर्यंत मुदतवाढ…