vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

लोकसंवाद-2026’मधून शेवगावात शासकीय योजनांचा जागर_*गणेशोत्सवाच्या माध्यमातून नागरिकांना विविध योजना व जनहिताच्या उपक्रमांची माहिती*

‘लोकसंवाद-2026’मधून शेवगावात शासकीय योजनांचा जागर_*गणेशोत्सवाच्या माध्यमातून नागरिकांना विविध योजना व जनहिताच्या उपक्रमांची माहिती*

 

अहिल्यानगर, प्रतिनिधी: गणेशोत्सवाच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजना, लोककल्याणकारी निर्णय आणि जनहिताच्या उपक्रमांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी राज्यभर राबविण्यात येत असलेल्या ‘लोकसंवाद-2026’ या विशेष जनजागृती उपक्रमांतर्गत बुधवार (दि २३) रोजी शेवगाव येथे शासकीय योजनांचा जागर करण्यात आला. गणेशोत्सवाच्या निमित्ताने नागरिकांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग असलेल्या ठिकाणी योजनांची माहिती थेट नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात आली.

जिल्हा माहिती कार्यालय, अहिल्यानगर आणि शेवगाव शहरातील माळीगल्ली येथील शिवशक्ती युवक मंडळाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या उपक्रमात पोलीस निरीक्षक मोहन बोरसे आणि नायब तहसीलदार निलेश वाघमारे यांनी नागरिकांना विविध विषयांवर मार्गदर्शन केले.*‘लोकसंवाद’मधून शासन आणि नागरिकांमध्ये संवाद अधिक प्रभावी

जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत यांनी ‘लोकसंवाद-2026’ या उपक्रमाची भूमिका आणि उद्देश स्पष्ट केला. शासकीय योजनांची माहिती केवळ जाणून घेणे नव्हे, तर पात्रतेनुसार त्यांचा लाभ घेणे आणि योजनांची माहिती कुटुंबातील तसेच परिसरातील इतर नागरिकांपर्यंत पोहोचविणे, हा ‘लोकसंवाद’ उपक्रमाचा महत्त्वाचा उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.

शासन आणि नागरिक यांच्यातील संवाद अधिक प्रभावी करण्यासाठी नागरिकांचा सहभाग असलेल्या विविध सार्वजनिक उपक्रमांच्या माध्यमातून शासकीय योजना आणि जनहिताच्या निर्णयांची माहिती पोहोचविणे आवश्यक आहे. अशा उपक्रमांमुळे योजनांबाबतची जनजागृती वाढण्यास मदत होते, असेही श्री. चिलवंत यांनी नमूद केले.*सायबर सुरक्षा आणि समाजमाध्यमांच्या वापराबाबत मार्गदर्शन*

पोलीस निरीक्षक मोहन बोरसे यांनी सायबर सुरक्षा तसेच समाजमाध्यमांचा वापर करताना घ्यावयाची काळजी याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. समाजमाध्यमांवर वैयक्तिक माहिती शेअर करताना नागरिकांनी सावधगिरी बाळगावी, अनोळखी व्यक्तींकडून येणाऱ्या संशयास्पद संदेश, लिंक किंवा फोनला प्रतिसाद देताना काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

*ज्येष्ठ नागरिक, महिलांसाठीच्या योजनांची माहिती*नायब तहसीलदार निलेश वाघमारे यांनी ज्येष्ठ नागरिक तसेच महिलांसाठी शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली. संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम तसेच शिधापत्रिका काढण्याची प्रक्रिया याबाबत त्यांनी नागरिकांना मार्गदर्शन केले. पात्र नागरिकांनी आपल्या गरजेनुसार शासकीय योजनांची माहिती घेऊन पात्रतेनुसार योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले*स्वच्छता व पर्यावरण संवर्धनाबाबतही जनजागृती*

पत्रकार अलीम शेख यांनी स्वच्छता, पर्यावरण संवर्धन आणि नागरिकांची सामाजिक जबाबदारी याबाबत मार्गदर्शन केले. परिसराची स्वच्छता राखणे, पर्यावरणपूरक उपक्रमांना प्रोत्साहन देणे तसेच सार्वजनिक ठिकाणी स्वच्छतेबाबत नागरिकांनी जागरूक राहणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.कार्यक्रमाला मंडळाचे मार्गदर्शक बाळासाहेब डाके, अनिकेत डाके, मनीष बाहेती, शिवशक्ती युवक मंडळाचे अध्यक्ष नवनाथ डाके, मल्हारी घुसाळे, दत्तात्रय घोंगडे, प्रदीप लोंढे, सोमनाथ घोंगडे, डाके मेजर, अनिल खैरे, दत्तात्रय फुंदे आदी उपस्थित होते.

 

०००००

संबंधित पोस्ट

महाबळेश्वर महापर्यटन महोत्सव २०२५’ यशस्वी करूया- पर्यटनमंत्री शंभूराज देसाई,महोत्सवात नेत्रदीपक लेझर शो, टेंट सिंटी, पर्यटकांसाठी साहसी खेळ,विविध परिसंवाद, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन..

अन्न व औषध प्रशासनात दक्षता आणि गुप्त वार्ता विभाग स्वतंत्र करावे-अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ

vishwatmaklokswamivarta

डॉ. मीरा ढास यांनी स्वीकारला शिर्डी येथील माहिती अधिकारी पदाचा कार्यभार

भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळा-२०२५ मधील महाराष्ट्र दालनाचे १४ नोव्हेंबरला उद्घाटन सांस्कृतिक कार्यक्रमाचे १५ नोव्हेंबरला आयोजन

vishwatmaklokswamivarta

सातारा जिल्ह्यातील वीर धरणातून २७ हजार ७९७ क्युसेक्स विसर्ग;नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा

कोकण, मुंबई महानगर प्रदेश, आणि पश्चिम महाराष्ट्रातील घाट परिसरात १८-१९ ऑगस्ट रोजी मुसळधार पावसाचा अंदाज नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta