vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

दलित-आदिवासींच्या हक्कांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा-दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांना तातडीची मदत द्या; भूमिहीन कास्तकारांना सातबारा द्या – दलित आघाडी जिल्हाप्रमुख अ‍ॅड. मगरे

दलित-आदिवासींच्या हक्कांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा-दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांना तातडीची मदत द्या; भूमिहीन कास्तकारांना सातबारा द्या – दलित आघाडी जिल्हाप्रमुख अ‍ॅड. मगरे

जालना, (प्रतिनिधी)-दलित, आदिवासी आणि वंचित समाजाच्या विविध प्रलंबित प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शिवसेना दलित आघाडीच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. दलित आघाडी जिल्हाप्रमुख तथा भुमिहिन कास्तकरांचे नेते अ‍ॅड. भास्कर मगरे यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या मोर्चात सुमारे तीन ते साडेतीन हजार कास्तकर, भुमिहिन, बेघर नागरिक सहभागी झाले होते. हातात मागण्यांचे फलक घेत आंदोलकांनी शासनाच्या धोरणांविरोधात घोषणाबाजी करीत जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. दरम्यान यावेळी शिवसेना दलित आघाडीचे जिल्हाप्रमुख अ‍ॅड.भास्कर मगरे यांनी जिल्हाधिकार्‍यांना आपल्या मागण्यांचे निवेदन सादर करुन सविस्तर चर्चा केली.

दरम्यान रखरखत्या ऊन्हात रस्त्याच्या एका बाजुला अगदी शिस्तीत हा मोर्चा निघाला. दुष्काळामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून, शासनानेदुष्काळग्रस्त शेतकर्‍यांना तातडीने आर्थिक मदत उपलब्ध करून द्यावी, अशी प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली. तसेच अनेक वर्षांपासून जमिनीवर प्रत्यक्ष शेती करणार्‍या भूमिहीन कास्तकारांच्या जमिनीच्या हक्काचा प्रश्न प्रलंबित आहे. या कास्तकारांना त्यांच्या जमिनीचे सातबारा उतारे देऊन जमिनीवरील हक्क निश्चित करावा, अशी मागणीही मोर्चाच्या माध्यमातून करण्यात आली.यावेळी अ‍ॅड. भास्करराव मगरे म्हणाले की, वर्षानुवर्षे जमिनीवर कष्ट करून शेती करणार्‍या भूमिहीन कास्तकारांना अद्यापही जमिनीच्या मालकीचा अधिकृत हक्क मिळालेला नाही. प्रत्यक्ष शेती करणार्‍या कास्तकारांच्या जमिनीचा

प्रश्न शासनाने गांभीर्याने सोडवून त्यांना सातबारा उतारे देण्याची कार्यवाही करावी. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी, शेतमजूर आणिग्रामीण भागातील वंचित घटकांवर मोठे आर्थिक संकट ओढवले आहे. त्यामुळे दुष्काळग्रस्त भागातील शेतकर्‍यांना तातडीने आर्थिक मदत देण्याबरोबरच रोजगाराची साधने उपलब्ध करून द्यावीत, अशी मागणीही मगरे यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे केली.दलित आणि आदिवासी समाजाच्या विविध प्रश्नांवर शासनाने केवळ आश्वासने न देता ठोस निर्णय घ्यावेत. प्रलंबित मागण्यांची तातडीने पूर्तता करून वंचित समाजाला न्याय द्यावा, अशी मागणी आंदोलकांनी केली. या मोर्चात शिवसेना दलित आघाडीचे जिल्हाप्रमुख अ‍ॅड. भास्कर मगरे, जिल्हा सचिव जय खरात, उपजिल्हाप्रमुख अण्णासाहेब बाळराज, प्रल्हाद साळवे, आकाश निकाळजे,विलास खरात, संदीप काकडे, सुनील निर्मळ, बाळासाहेब बोबडे, नाना राजगिरे, बाळासाहेब भांदर्गे, बाळासाहेब गाडेकर, विष्णु शिंदे, दशरथ तांबे, भाऊसाहेब पांजगे, विजय मोरे, गोरख खरात, बाबुराव साबळे, दिलीप पटेकर, सुभाष वाघमारे, गणेश खरात यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.मोर्चाच्या माध्यमातून दलित, आदिवासी आणि भूमिहीन कास्तकारांच्या प्रश्नांना पुन्हा एकदा ऐरणीवर आणण्यात आले असून, शासन आणि प्रशासनाने या मागण्यांवर तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी अ‍ॅड. भास्कर मगरे यांनी केली.

००फोटो ओळी….

१- यावेळी जिल्हाधिकारी यांना निवेदन देतांना शिवसेना दलित आघाडीचेजिल्हाप्रमुख अ‍ॅड. भास्करराव मगरे.२- जनआक्रोश मोर्चात सहभागी झालेले भुमिहिन कास्तकर आदी

000

संबंधित पोस्ट

फिनलँडचे मुंबईतील वाणिज्यदूत श्री. एरिक आफ हेल्स्ट्रॉम यांनी महानगरपालिका आयुक्त श्रीमती अश्विनी भिडे यांची आज बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयात सदिच्छा भेट

vishwatmaklokswamivarta

वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाला स्वायतत्ता देण्यासाठी समिती स्थापन

पनीरच्या नावाखाली ॲनालॉगचा वापर- आढळल्यास आता थेट कारवाई

वंचित समाजाला शासकीय प्रमाणपत्रे देण्यासाठी व्यापक मोहीम राबविणार – मंत्री अतुल सावे

सातारा जिल्हा रुग्णालयातील एमआरआय, कॅथलॅब सेवांचे तातडीने लोकार्पण करा-मंत्री प्रकाश आबिटकर

डॉ. संजय मुन हे फुले – आंबेडकरी चळवळीचे प्रभावी प्रसारक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नात रमा यशवंतराव आंबेडकर यांचे गौरोद्गार : डॉ. संजय मुन यांचा गौरव सोहळा उत्साहात संपन्न

vishwatmaklokswamivarta