vishwatmaklokswamivarta
Breaking News
इतर

स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत अलिबागमध्ये बँकिंग क्षेत्राची स्वच्छता मोहीम..

स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत अलिबागमध्ये बँकिंग क्षेत्राची स्वच्छता मोहीम..

रायगड-अलिबाग, प्रतिनिधी : ‘स्वच्छता ही सेवा अभियान २०२६’ अंतर्गत बँक ऑफ इंडिया, अग्रणी बँक कार्यालय, रायगड यांच्या पुढाकाराने अलिबाग शहरात विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या उपक्रमात बँक ऑफ इंडिया तसेच जिल्ह्यातील विविध बँकांचे अधिकारी व कर्मचारी अशा ७० हून अधिक सहभागी झाले.

या कार्यक्रमास बँक ऑफ इंडियाच्या डेप्युटी जनरल मॅनेजर श्रीमती दिपान्विता सहानी, असिस्टंट जनरल मॅनेजर श्री. भरत सहाय, अलिबाग नगरपालिकेच्या उपनगराध्यक्ष श्रीमती मानसी म्हात्रे तसेच अलिबाग नगरपरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. सागर साळुंखे यांची प्रमुख उपस्थिती होती. जिल्हा अग्रणी प्रबंधक, रायगड श्री. सुधीर गायकवाड यांनी अभियानाचे आयोजन व समन्वय केला.

‘स्वच्छता ही प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी आहे’ हा संदेश देत सहभागी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अलिबाग शहरातील विविध रस्ते व सार्वजनिक ठिकाणी प्रत्यक्ष स्वच्छता मोहीम राबविली. परिसराची स्वच्छता, सार्वजनिक ठिकाणांची निगा राखण्यासोबतच नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यात आली.

या उपक्रमांतर्गत अलिबाग शहर स्वच्छ ठेवण्यासाठी दररोज कार्यरत असलेल्या नगरपालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांना स्वच्छता व संरक्षक साहित्याच्या किटचे वितरण करण्यात आले. सफाई कर्मचाऱ्यांच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करून त्यांच्या कार्याला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आलाबँकिंग क्षेत्रातील अधिकारी-कर्मचारी, स्थानिक प्रशासन आणि नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी एकत्र येत राबविलेल्या या उपक्रमातून ‘स्वच्छ अलिबाग, सुंदर अलिबाग’ या संकल्पनेला बळ मिळाले. स्वच्छतेची सवय दैनंदिन जीवनाचा भाग बनवून स्वच्छ व निरोगी समाजनिर्मितीसाठी प्रत्येकाने योगदान द्यावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

संबंधित पोस्ट

मिशन वात्सल्य व मिशन शक्ती अंतर्गत जिल्हास्तरीय बैठक संपन्न

vishwatmaklokswamivarta

मतदानाचे आवाहन करणा-या मतदान यंत्राच्या मॅस्कॉटला नवी मुंबईकर नागरिकांची पसंती

दर्पणकारांचे पत्रकारितेतील योगदान आणि आजच्या पत्रकारांची नैतिक जबाबदारी

जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त ‘कौशल्य विकास काळाची गरज’  वक्तृत्व स्पर्धेला युवक-युवतींचा उत्स्फूर्त प्रतिसाद

भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांनी महाडीबीटीवर अर्ज करावेत

vishwatmaklokswamivarta

खासगी कृत्रिम रेतन सेवादात्यांनी केलेल्या कामाची नोंदणी-भारत पशुधन प्रणालीवर करणे आवश्यक ‘गोजातीय प्रजनन व नियमन’ विषयावर कार्यशाळा संपन्न