vishwatmaklokswamivarta
Breaking News
इतर

स्वच्छता ही सेवा २०२६”उपक्रमांतर्गत नमुंमपा परिवहन उपक्रमाची विशेष स्वच्छता मोहीम

“स्वच्छता ही सेवा २०२६”उपक्रमांतर्गत नमुंमपा परिवहन उपक्रमाची विशेष स्वच्छता मोहीम

 

          सेवा संकल्प अभियानांतर्गत “स्वच्छता ही सेवा २०२६” या उपक्रमाच्या अनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमाच्या अखत्यारितील विविध बस स्थानके व परिसर कचरामुक्त करण्याच्या उद्देशाने सकाळी ८.०० पासून विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.

          सदर स्वच्छता मोहीम नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमाच्या वतीने बेलापूर रेल्वे स्थानक, नेरूळ बस स्थानक, ऐरोली बस स्थानक, वाशी रेल्वे स्थानक, कोपरखैरणे बस स्थानक, सीबीडी बस स्थानक, सारसोळे बस स्थानक, वाशी बस स्थानक, वाशी सेक्टर-७ तसेच आर्टिस्ट व्हिलेज या ठिकाणी नियोजनबद्ध पद्धतीने राबविण्यात आली.

          मोहिमेदरम्यान संबंधित बस स्थानके, प्रवासी परिसर, रस्त्यालगतचा परिसर तसेच सार्वजनिक ठिकाणी साचलेला कचरा व अनावश्यक साहित्य हटवून परिसराची स्वच्छता करण्यात आली. तसेच स्वच्छतेबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने उपस्थित अधिकारी व कर्मचारी यांनी स्वच्छतेची शपथ घेतली.

          सदर स्वच्छता मोहिमेस परिवहन समितीचे सभापती श्री.विकास झंजाड व परिवहन सदस्य तसेच परिवहन उपक्रमातील अधिकारी व कर्मचारी यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. संबंधितांनी परस्पर समन्वयाने काम करून 10 ठिकाणी ‘एक दिन – एक घंटा – एक साथ’ या उपक्रमांतर्गत स्वच्छता मोहीम यशस्वीरित्या पार पाडली.

          सदर मोहिमेचे नियोजन, समन्वय व प्रत्यक्ष अंमलबजावणी परिवहन व्यवस्थापक श्री. उमाकांत जंगले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. तसेच, स्वच्छता मोहिमेवर नजिकचे नियंत्रण व प्रभावी देखरेख ठेवण्यासाठी श्री. विवेक अचलकर, कार्यकारी अभियंता (यांत्रिकी) व श्री. सुनील साळुंखे, मुख्य वाहतूक अधिकारी यांची समन्वय व देखरेख अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.

          ‘स्वच्छता ही सेवा २०२६’ अभियानाच्या उद्दिष्टांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने सदर स्वच्छता मोहीम महत्त्वपूर्ण ठरली आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था वापरणाऱ्या प्रवाशांना स्वच्छ, सुरक्षित व आरोग्यदायी वातावरण उपलब्ध करून देण्याबरोबरच बस स्थानके व परिसर स्वच्छ ठेवण्याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण करणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे.

          नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमाच्या अखत्यारितील सर्व बस स्थानके, बस आगारे व सार्वजनिक परिसर स्वच्छ, सुंदर व कचरामुक्त ठेवण्यासाठी भविष्यातही नियमित स्वच्छता मोहीम, जनजागृती व स्वच्छताविषयक विविध उपक्रम सातत्याने राबविण्यात येणार

संबंधित पोस्ट

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेचा लाभ सर्व पात्र शेतकऱ्यांना होणार– सहकार मंत्री बाबासाहेब पाटील

राज्य दहशतवाद विरोधी पथकाची यवतमाळ आणि अहिल्यानगर जिल्ह्यात २१ ठिकाणी शोधमोहिम, काहीजण चौकशीसाठी ताब्यात.

आषाढी वारीनिमित्त नवी मुंबई महानगरपालिकेच्या विशेष स्वच्छता पथकाचे पंढरपूर नगरी स्वच्छता कार्य

मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्कमधून  मोठी  ऐतिहासिक आनंदाची बातमी -भारतीय भूमीवर जन्मलेल्या ‘गामिनी’ने दिला ४ बछड्यांना जन्म 🇮🇳

महाराष्ट्रातील क्रीडा आणि युवा विकास परिसंस्था बळकट करण्यासाठी केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन

जिल्हा नियोजनचा निधी 25 मार्चपूर्वी खर्च करावा-जिल्हाधिकारी आशिष येरेकर