vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

भूकंपाच्या पार्श्वभूमीवर नांदेड प्रशासन सतर्क जिल्ह्यात जीवित व वित्तहानी नाही नागरिकांनी घाबरू नये, अफवांवर विश्वास ठेवू नये – पालकमंत्री अतुल सावे

भूकंपाच्या पार्श्वभूमीवर नांदेड प्रशासन सतर्क जिल्ह्यात जीवित व वित्तहानी नाही नागरिकांनी घाबरू नये, अफवांवर विश्वास ठेवू नये – पालकमंत्री अतुल सावे

नांदेड ,हिंगोली प्रतिनिधी

दि. ३ :ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ०७:४६ व ०९:४३ वाजता भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याची माहिती जिल्हा आपत्कालीन कार्यकेंद्रास प्राप्त झाली आहे.राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राच्या अधिकृत माहितीनुसार, या भूकंपांची तीव्रता रिश्टर स्केलवर अनुक्रमे ३.३ व ४.५ इतकी नोंदविण्यात आली आहे. भूकंपाचा केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे गावाजवळ असल्याचे समजते.

या भूकंपामुळे नांदेड जिल्ह्यात कोणतीही जीवित अथवा वित्तहानी झाल्याची माहिती प्राप्त झालेली नाही. जिल्हा प्रशासनाने तत्काळ परिस्थितीचा आढावा घेतला असून, सर्व संबंधित यंत्रणा सतर्क ठेवण्यात आल्या आहेत.भूकंपाचे धक्के जाणवल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहावे. भूकंपाचे धक्के जाणवल्यास तत्काळ सुरक्षितपणे घराबाहेर पडून मोकळ्या जागेत थांबावे आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.

दरम्यान, जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून असून, त्यांनी जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधून आवश्यक सूचना दिल्या आहेत. नांदेड जिल्ह्यात कोणतीही जीवित अथवा वित्तहानी झालेली नसून, नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, घाबरून जाऊ नये आणि केवळ अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवावा, असे आवाहन पालकमंत्री अतुल सावे यांनी केले आहे.

000

संबंधित पोस्ट

समाजहितासाठी कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान ही राष्ट्रनिर्मितीची प्रेरणा – राज्यपाल जिष्णु देव वर्मा सर्वोत्तम नागरिक सन्मान सोहळ्यात १८ मान्यवरांचा गौरव

पीएम विश्वकर्मा योजनेतून जिल्ह्यातील पारंपरिक कारागिरांना कौशल्यविकासाची नवी दिशा –पालकमंत्री भरतशेठ गोगावले

vishwatmaklokswamivarta

पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयंम योजना नूतनीकरणासाठी अर्ज करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

बकरी ईद’ निमित्त सोसायट्यांमध्ये होणारी पशूंची अवैध हत्या प्रशासनाने रोखावी!- रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

दहा दिवसांत २९ लाख ७७ हजार ६७० भाविकांची केली आरोग्य तपासणी‘श्रीगणेशा आरोग्याचा’ उपक्रमाला राज्यभर उत्स्फूर्त प्रतिसाद; ५३ हजार शिबिरांचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

दि. 21 व दि.22 जुलै रोजी होणा-या नवी मुंबई महानगरपालिका पदभरतीसाठी यंत्रणा सज्ज…