vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

१० ऑक्टोबर रोजी ठाण्यात अनुसूचित जाती उपवर्गीकरण विरोधी विराट महामोर्चा 

१० ऑक्टोबर रोजी ठाण्यात अनुसूचित जाती उपवर्गीकरण विरोधी विराट महामोर्चा

 

ठाणे – प्रतिनिधी -संविधानिक आरक्षणातील अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाचा निर्णय रद्द करा, अनुसूचित जातीच्या २०११ च्या जनगणनेनुसार १८ टक्के तर २०२१ नुसार २० टक्के आरक्षण लागू करा या प्रमुख मागण्यांसाठी येत्या १० ऑक्टोबर रोजी ठाणे रेल्वे स्थानक येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा ते कोर्ट नाका येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा असा विराट महामोर्चा काढण्यात येणार आहे. मोर्चा नंतर ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ जाहीर सभा होणार असल्याची माहिती आज एका पत्रकार परिषदेत अनुसुचित जाती उपवर्गीकरण विरोधी महामोर्चा कृती समितीचे ठाणे जिल्हा अध्यक्ष पंढरीनाथ गायकवाड यांनी दिली.

यावेळी पत्रकार परिषदेला केंद्रीय सदस्य प्रा. जगन्नाथ बावा, आबासाहेब चासकर, सुखदेव उबाळे, बाळासाहेब ओव्हाळ, अलका जगताप, आनंद नवसागरे आदी मान्यवर उपस्थित होते.

राज्य सरकारने अनुसूचित जातीच्या आरक्षणात उपवर्गीकरण करण्याचा घाट घातला आहे. त्यात अ ब क ड अशी जातीची विभागणी करून एससी समाजामध्ये भांडणे लावण्याचा प्रयत्न केला आहे. राज्य शासनाचा हा कुटिल डाव हाणून पाडण्यासाठी ठाणे जिल्ह्यातील भीम योद्धा संघर्षास सज्ज झाले आहेत. ठाणे जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात यासाठी बैठका झाल्या असल्याची माहिती पंढरीनाथ गायकवाड यांनी दिली.

सरसेनापती आनंदराज आंबेडकर, डॉ. भीमराव आंबेडकर, डॉ. सुरेश माने, माजी मंत्री बबनराव घोलप, राजकुमार बडोले, माजी आमदार बाबुराव माने, संजय खामकर, शरदचंद्र जाधव आदी मान्यवरांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा निघणार आहे. अनुसूचित जाती मधील संपूर्ण ५९ जाती या उपवर्गीकरण विरोधात एकवटल्या असून लाखोंच्या संख्येने अनुयायी या मोर्चात सहभागी होणार असल्याचे पंढरीनाथ गायकवाड यांनी सांगितले

00000

संबंधित पोस्ट

राज्य महोत्सवांतर्गत महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धेचे आयोजनअधिकाधिक मंडळांनी सहभागी व्हावे   

vishwatmaklokswamivarta

कडधान्य आत्मनिर्भरता अभियानांतर्गत कडधान्य प्रक्रिया युनिटसाठी अनुदान

महाखनिज २.० पोर्टलशी विविध विभागांच्या प्रणालींचे तातडीने संलग्नीकरण करा – मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

भारतीय सशस्त्र सैन्या दलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत सुर्वणसंधी..

हिंद दी चादर’ कार्यक्रमाचा विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांच्याकडून आढावा

vishwatmaklokswamivarta

आता खैर नाही खासदार नरेश म्हस्के यांच्या पाठपुराव्याला यश !  दिव्यांगांच्या डब्यात आरपीएफ जवान तैनात राहणार ..