vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

कंगणाला आवरा, नाहीतर जनआंदोलन होईल……

कंगणाला आवरा, नाहीतर जनआंदोलन होईल……

मुंबई प्रतिनिधी :  गेल्या काही दिवसात कंगना राणावत या अभिनेत्रीची बेताल वक्तव्ये आणि समाजामध्ये तेढ निर्माण करणारे ट्विटमुळे कायदा आणि सुव्यवस्था अडचणीत येत असल्याने,जनप्रक्षोभ वाढत असतानाच काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने पद्मश्री बहाल करून एकप्रकारे कुप्रवृत्तीला प्रोत्साहनच दिल्याने देशाला स्वातंत्र भीक म्हणून मिळाले असे विधान करून भारतीय स्वातंत्र्याच्या इतिहासावर प्रश्नचिन्ह उभे केल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पक्ष,सेवादल आणि श्रीमती सोनिया ब्रिगेड ऑल इंडिया कॉग्रेस च्या महाराष्ट्र प्रदेश च्या कल्याण डोंबिवली जिल्हा प्रमुख श्री शिबु शेख यांनी कल्याणच्या मानपाडा पोलीस ठाणे,डोंबिवली पूर्व येथे एक निवेदन देऊन कंगना राणावत च्या विरोधात राष्ट्रद्रोहाचा गुन्हा नोंदवून ,तिला दिलेला पद्मश्री पुरस्कार भारत सरकारने परत घ्यावा,असे निवेदन दिले आहे.

यावेळी mpcc सचिव श्री.प्रकाश मुथा,सेवादलाचे जिल्हा अध्यक्ष लालचंद तिवारी,महिला ब्रिगेड जिल्हा अध्यक्ष मीनाक्षी घुमरे म्याडम तसेच श्रीमती सोनिया गांधी ब्रिगेड ऑल इंडियाकाँग्रेसचे महाराष्ट्र् प्रदेश अध्यक्ष श्री.तानाजी घाग यांनी ब्रिगेड च्या शेकडो कार्यकर्त्यांसह वरिष्ठ पोलीस निरीक्षक बागडे साहेब यांना निवेदनातील विषयाचे गांमभिर्य लक्षात तर आणून दिलेच परंतु भविष्यात जर राष्ट्रद्रोही वक्तव्य कंगना असो की विक्रम गोखले असो यांनी केली तर सोनिया ब्रिगेडचे कार्यकर्ते वेगळ्या भाषेत उत्तर देतील व याची जबाबदारी प्रशासन आणि वक्तव्य करणार्याची असेल.त्यामुळे कंगणाला आवरा असा इशारा देण्यात आला.

संबंधित पोस्ट

आगामी लोकसभा निवडणूकीमध्ये मतदान करण्यासाठी मतदार नोंदणीची अखेरची संधी..!सर्व पात्र मतदारांनी आपले नाव मतदारयादीमध्ये आहे किंवा नाही याची तपासणी करावी

vishwatmaklokswamivarta

ज्येष्ठ पत्रकार रामभाऊ जोशी यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रद्धांजली

vishwatmaklokswamivarta

हिंद दी चादर’ निमित्त २३ फेब्रुवारी रोजी सामूहिक गीत गायन -कोकण विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी कोकण विभागातील सुमारे २० हजार शैक्षणिक संस्था, ५१ लाख विद्यार्थी आणि १.५ लाख शिक्षक व कर्मचारी एकाच वेळी होणार सहभागी

vishwatmaklokswamivarta

आंतरराष्ट्रीय योग दिन; ‘माय भारत’ व ‘योगसंगम’ पोर्टलवर नोंदणी करा –जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांचे आवाहन

अकोट येथे महिला शिक्षिकांसाठी कार्यशाळा

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष श्री. शेरसिंग डागोर यांची नवी मुंबई महानगरपालिकेत आढावा बैठक…

vishwatmaklokswamivarta