
बदनापूरात आरटीई प्रवेश प्रक्रियेची चौकशी करा!जिल्हाप्रमुख रुपम घुगे यांची शिक्षणाधिकार्यांकडे मागणी;विद्यार्थिनी पूर्वा जाधव हिला न्याय देण्याचे आवाहन
प्रतिनिधी- बदनापूर पंचायत समिती परिसरातील शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) प्रवेश प्रक्रियेत कथित अनियमितता झाल्याच्याआरोपांमुळे प्रश्न उपस्थित होत आहेत. पात्र विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारणे, आर्थिक गैरव्यवहार तसेच बनावट कागदपत्रांच्या आधारे प्रवेश दिल्याच्या तक्रारींची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी,अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या महिला आघाडीच्या
जिल्हाप्रमुख रुपम घुगे यांनी केली आहे.बदनापूर येथे उपोषणाला बसलेल्या चिमुकली विद्यार्थी पूर्वा जाधव हिची आजशिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख रुपम रमेश घुगे यांनी भेट घेवूनसविस्तर तिच्याशी चर्चा करुन न्याय देण्याचे आश्वासन दिले. यावेळीशिवसैनिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. यासंदर्भात त्यांनी जिल्हापरिषद जालना येथील प्राथमिक शिक्षणाधिकार्यांना निवेदन सादर केले आहे.आरटीई प्रवेश प्रक्रियेतील कथित गैरप्रकारांमुळे गरीब व गरजूविद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या हक्कावर परिणाम होत असल्याचे निवेदनातनमूद करण्यात आले आहे. या प्रकरणातील पीडित विद्यार्थिनी पूर्वा राहुलजाधव हिला न्याय मिळावा, तसेच बदनापूर परिसरातील संपूर्ण आरटीई प्रवेशप्रक्रियेची सखोल व निष्पक्ष चौकशी करण्यात यावी, अशी मागणी घुगे यांनीकेली आहे. संबंधित तक्रारींची तातडीने दखल घेऊन वस्तुस्थिती तपासावी,दोषी आढळणार्यांवर नियमानुसार कठोर कारवाई करावी आणि प्रवेशापासून वंचितराहिलेल्या पात्र विद्यार्थ्यांना न्याय मिळवून द्यावा, असेही निवेदनात
म्हटले आहे.आरटीई कायद्यानुसार पात्र विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी मिळणे आवश्यकअसून, प्रवेश प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी प्रशासनाने या प्रकरणाचीगांभीर्याने दखल घ्यावी, अशी मागणी महिला जिल्हाप्रमुख रुपम घुगे यांनीकेली आहे. या निवेदनावर जिल्हा संघटक भानुदास घुगे, गजानंद लहाने, विशालसोनवणे, शेख रियाज सरदार, मिर्झा पैâजान अफजल बेग आदींच्या स्वाक्षर्याआहेत.
०००००फोटो ओळी……५-बदनापूर येथे उपोषणाला बसलेल्या चिमुकली विद्यार्थी पूर्वा जाधव हिचीआज शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख रुपम रमेश घुगे यांनी भेट घेवूनसविस्तर तिच्याशी चर्चा करुन न्याय देण्याचे आश्वासन दिले.
०००००००००



