vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

मुंबईतील धारावीत पाण्यासाठी काँग्रेसचे आंदोलन! खासदार वर्षा गायकवाड आणि आमदार ज्योती गायकवाड शेकडो नागरिकांसह रस्त्यावर

मुंबईतील धारावीत पाण्यासाठी काँग्रेसचे आंदोलन! खासदार वर्षा गायकवाड आणि आमदार ज्योती गायकवाड शेकडो नागरिकांसह रस्त्यावर

 

 मुंबई प्रतिनिधी | धारावी,धारावी परिसरातील पाणीटंचाईच्या समस्येविरोधात काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड आणि धारावीच्या आमदार ज्योती गायकवाड यांनी शेकडो स्थानिक नागरिकांसह आंदोलन केले. धारावीकरांना पुरेसा पाणीपुरवठा मिळावा, या मागणीसाठी काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली.

🔹 धारावी ते जी/उत्तर विभाग कार्यालयापर्यंत मोर्चा,धारावीतील पाणीटंचाईच्या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी धारावी येथून मुंबई महानगरपालिकेच्या जी/उत्तर विभाग कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला. मात्र, पोलिसांनी आंदोलकांना धारावीतच अडवले.

तरीही काँग्रेसचे कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांनी माघार न घेता धारावीकरांना नियमित व पुरेसा पाणीपुरवठा मिळावा, या मागणीसाठी तब्बल ४ तास ३० मिनिटे आंदोलन सुरू ठेवले.🔹 सात दिवसांत पाणीप्रश्न सोडविण्याचे आश्वासनआंदोलनानंतर जल विभागाचे अधिकारी श्री. शेलवले यांनी पुढील ७ दिवसांत पाणीटंचाईची समस्या दूर करण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे आता प्रशासन या आश्वासनाची कितपत पूर्तता करते, याकडे धारावीकरांचे लक्ष लागले आहे.

🔹 पाणी हा नागरिकांचा मूलभूत अधिकार!काँग्रेसने या आंदोलनादरम्यान आपली भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, पाणी हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत अधिकार आहे; तो कोणाचाही उपकार नाही.प्रशासनाने दिलेल्या आश्वासनानुसार सात दिवसांच्या आत पाणीटंचाईची समस्या दूर झाली नाही, तर धारावीकरांच्या हक्कांसाठी पुन्हा आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही काँग्रेसच्या वतीने देण्यात आला.

धारावीतील पाणीटंचाईचा प्रश्न लवकरात लवकर सुटून नागरिकांना नियमित आणि पुरेसा पाणीपुरवठा मिळणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

संबंधित पोस्ट

मतदान केंद्रांवर 11 व 12 एप्रिल रोजी विशेष मॅपिंग शिबिर;महापौरांचे नागरिकांना सहकार्याचे आवाहन

मुंबईत सार्वत्रिक पारशी नोंदणी मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद…

vishwatmaklokswamivarta

शीव (सायन) येथील लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय पुनर्विकास टप्पा दोनच्या रुग्णालय इमारतीचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संपन्न

ग्रामीण पाणीपुरवठा योजनांसाठी ‘जल अर्पण दिवस’ उपक्रम 💧

लग्नाकडे विवेकी नजरेने पाहायला शिकवणारी संवादशाळा घाटकोपर येथे संपन्न

vishwatmaklokswamivarta

पैठण तालुक्याचे विविध विकास कामाचा आढावा.सर्वसामान्यांच्या तक्रारी निवारणाबरोबरच विविध विकास योजनांची प्रभावी अंमलबजावणी करा- जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी.