vishwatmaklokswamivarta
Breaking News
व्यवसाय

महाजिओटेक’मध्ये सेवानिवृत्त शासकीय अधिकाऱ्यांसाठी संधी· इच्छुकांना अर्ज करण्याचे आवाहन

महाजिओटेक’मध्ये सेवानिवृत्त शासकीय अधिकाऱ्यांसाठी संधी· इच्छुकांना अर्ज करण्याचे आवाहन

मुंबई, प्रतिनिधी : महाराष्ट्र शासनाच्या नियोजन विभागाच्या अखत्यारीतील महाराष्ट्र जिओस्पेशिअल टेक्नॉलॉजी अॅप्लिकेशन सेंटर (महाजिओटेक), मुंबई येथे विविध पदांवर काम करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या सेवेतून सेवानिवृत्त झालेल्या अनुभवी व पात्र शासकीय अधिकाऱ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. यामध्ये आस्थापना अधिकारी, लेखा अधिकारी आणि सहायक कक्ष अधिकारी या प्रत्येकी एका पदाचा समावेश असून, कंत्राटी किंवा सेवा करार पद्धतीने ही नियुक्ती करण्यात येणार आहे, असे व्यवस्थापकीय संचालक(महाजिओटेक) यांनी कळवले आहे.

महाजिओटेक ही कंपनी अधिनियमाच्या कलम ८ अंतर्गत नोंदणीकृत संस्था असून, महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने जिओ-स्पेशिअल तंत्रज्ञानाशी संबंधित सेवा आणि वैज्ञानिक माहिती पुरविण्याचे कार्य करते.

अर्ज करण्यास १५ दिवसांची मुदतभरती संदर्भातील सविस्तर जाहिरात, पात्रता निकष आणि अर्जाचा नमुना यासाठी नियोजन विभागाच्या www.plan.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.

इच्छुक व पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांसह विहित नमुन्यातील अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून १५ दिवसांच्या आत mahageotech@outlook.com किंवा desk1418.plan-mh@mah.gov.in या ई-मेल वर सादर करावेत, असे महाराष्ट्र जिओस्पेशिअल टेक्नॉलॉजी अप्लिकेशन सेंटर (महाजिओटेक), मुंबई यांनी कळवले आहे.

0000

संबंधित पोस्ट

परतवाड्यात 16 मे रोजी सेंट्रल बँकेचा ‘एमएसएमई राष्ट्रव्यापी क्रेडिट आउटरीच कार्यक्रम’; उद्योजकांना जागेवरच मिळणार कर्ज मंजुरी पत्र

वैश्विक अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवरही देशाकडे सध्या सुमारे दोन महिन्यांचा इंधनसाठा उपलब्ध-इंडियन बायोगॅस असोसिएशनचे अध्यक्ष गौरव केडिया यांनी सांगितले.

vishwatmaklokswamivarta

कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रातर्फेसोमवारी (दि.३०) रोजगार मेळावा

तृतीयपंथीय उमेदवारांसाठी गुरूवारी विशेष रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन मेळावा

गोदाम बांधकाम घटकासाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन

तेलबिया व कडधान्य प्रक्रिया उद्योगांना चालना; गोदाम, ऑईल मिल आणि प्रक्रिया युनिटसाठी लाखोंचे अनुदान